Saturday, June 15, 2024

अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या लग्नामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकतेच तिने समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमद याच्यासोबत नुकतेच लग्न केले आहे. यावर चाहत्यांनी अनके प्रतिक्रिया दिल्या. तसेच तिच्या लग्नाच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. अशातच आता अयोध्या येथील महंत राजू दास यांनी तिच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. तर चला बघूया कि नेमके महंत दास यांनी काय विधान केले?

अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar) हिच्या लग्नावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता अयोध्या येथील महंत राजू दास यांनी स्वराबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘स्वरा भास्कर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार असेल तर तिला ह्या लग्नाच्या शुभेच्छा.’ राजू दास हे अयोध्येतील हनुमानगढी मंदिरातील महंत आहेत.

राजू दास म्हणाले की, ‘स्वरा भास्करने अशा समाजात लग्न केले आहे, त्यांना त्यांच्याच बहिणींशी लग्न करावे लागते. त्यामुळे महिलांना तलाक, तलाक, तलाक म्हणत अनेक पुरुषांसोबत रात्र काढावी लागते. ते पुढे म्हणाले ज्या मुलाला स्वरा भास्करने 10 दिवसांपूर्वी ट्विट केले करत भाऊ, चांगल्या मुलीशी लग्न कर असं म्हंटल होते. आता त्याच मुलाशी दहा दिवसांनी ती लग्न करते. स्वरा भास्कर जर स्त्री शक्ती आणि सशक्त स्त्री असेल तर तिने त्या समाजात लग्न करायला नको होते. पण आता तिने लग्न केलेच आहे तर तिचे स्वागत आहे. तिने सनातन धर्मियांच्या डोक्यावरचे ओझे हलके झाले.’

त्याचप्रमाणे हिंदू राजकीय कार्यकर्ता साध्वी प्राची यांनीही स्वराच्या लग्नावरुन टीकात्मक विधान केले आहे. या वादग्रस्त विधानावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. महंत राजू दास यांच्या या विधानाने खळबळ माजवली आहे. (mahant-raju-das-controversy-statment-on-bollywood-actress-swara-bhaskasr-wedding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नावर महंत राजू दास यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘ज्या समाजात संबंध प्रस्थापित…’
नवाजुद्दीन सिद्धीकीच्या नोकरणीने साक्ष बदलवताच भावाने साधला निशाणा म्हणाला, ‘अजून कितींना विकत घेणार?’

हे देखील वाचा