Sunday, May 19, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचे दिले आश्वासन

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी त्याच्या घरी पोहोचले. सलमान खानच्या घरी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची प्रकृती जाणून घेतली. रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अभिनेत्याच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरात उपस्थित होता. गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून पळून गेले. अभिनेत्याच्या घरावर कथित गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सरकार त्यांच्या पाठीशी असून गुन्हेगारी प्रवृत्तीची कोणतीही टोळी किंवा व्यक्ती अराजक पसरवू शकत नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अभिनेत्याची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी सलमान खानला भेटलो आणि सरकार त्याच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच मी पोलीस पथकाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. हा महाराष्ट्र आहे, इथे टोळ्या उरल्या नाहीत. आम्ही सर्व टोळ्या आणि गुंडांना उखडून टाकू आणि गुंडगिरी इथे चालू देणार नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

सीएम पुढे म्हणाले की, मी पोलीस आयुक्तांना सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या लोकांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. मागच्या सरकारमध्ये काय झाले यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मात्र राज्यातील कोणत्याही व्यक्तीला इजा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळ्या आणि गुंडांना आम्ही उखडून टाकू.

दबंग अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराबाबत मोठा खुलासा झाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी (16 एप्रिल) सांगितले की, अटक केलेल्या दोघांनी ही घटना घडण्यापूर्वी तीन वेळा अभिनेत्याच्या घराभोवती फेरफटका मारला होता. विकी गुप्ता (24 वर्षे) आणि सागर पाल (21 वर्षे) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत, ते बिहारचे रहिवासी आहेत. रविवारी सकाळी वांद्रे परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दिया बालनने ‘ॲनिमल’वर शेअर केले तिचे मत, रणबीर कपूरच्या चित्रपटाबद्दल दिले हे मोठे वक्तव्य
‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित

हे देखील वाचा