Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड Tamanna Bhatia | तमन्ना भाटिया अडचणीत ! IPL च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने बजावले समन्स

Tamanna Bhatia | तमन्ना भाटिया अडचणीत ! IPL च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने बजावले समन्स

Tamanna Bhatia |फेअरप्ले ॲपवर आयपीएल 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tammana Bhatia)  चौकशीसाठी बोलावले आहे, ज्यामुळे व्हायकॉमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तिला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो त्याच्यासमोर हजर झाला नाही. त्याऐवजी त्याने आपले म्हणणे नोंदवण्यासाठी तारीख आणि वेळ मागितली होती आणि आपण त्या तारखेला भारतात नसल्याचे सांगितले होते.

वायाकॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने फेअर प्ले ॲपविरोधात एफआयआर दाखल केला होता. तमन्नाने फेअर प्लेचे प्रमोशन केले होते. सायबर पोलिसांना भाटिया यांच्याकडून हे समजून घ्यायचे आहे की फेअर फ्लेचा प्रचार करण्यासाठी त्यांच्याशी कोणी संपर्क साधला, किती पैसे दिले, कोणी केले इत्यादी. वायाकॉमने तक्रारीत दावा केला आहे की फेअर फ्लेने आयपीएल 2023 चे बेकायदेशीरपणे स्क्रीनिंग केले आणि याचे नुकसान त्यांना भोगावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘दिवसाचे 15 तास काम करणे ही व्यावसायिक मजबुरी झाली आहे’, शुभांगी अत्रेने मांडले मत
इलियाना डिक्रूझने सांगितले चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण, पुनरागमनावर केले मोठे वक्तव्य

हे देखील वाचा