Friday, July 5, 2024

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम’ समीर चौघुले मीडियावर संतापले; म्हणाले, “अशक्य थापाडी…”,

महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमातुन विनोदी शैलीमुळे ‘समीर चौगुले‘ यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिनयासाेबतच ते उत्तम लेखकही आहे. त्यांची अफलातून विनोद शैली ही प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडते. समीर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ते नेहमी फोटो, व्हिडीओ, शेअर करत असतात, पण या वेळी विनोदी नटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी राग व्यक्त केला आहे. पण रागामागचे नेमके काय कारण आहे? चला जाणून घेऊया…

विनोदी अभिनेता ‘समीर चौगुले’ (Samir Choughule) यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राग व्यक्त केला आहे. तर झाले असे की, एका ऑनलाईन पोर्टलने समीर चौगुले यांच्या आलिशान घराचे फोटो असे कॅप्शन दिले. मग तुम्ही म्हणाल यात काय वावगं आहे. खरी गंमत तर तेव्हा घडली जेव्हा या कॅप्शन खाली एका वेब पोर्टलने भलत्याच घराचे फोटो टाकले. खरं बघायला गेलं तर हे घर समीर यांचे नाही. हे बाब स्वतः समीर यांनी सोशल मीडियावर शेअर करत सांगितली आहे. यासाेबत त्यांनी बातम्या करणाऱ्या वेब पोर्टलचेही चांगलेच कान उपटले आहे.

याचा समाचार घेतांना त्यांनी पोस्ट मध्ये लिहले की, “माझ्या नसलेल्या मोठ्या घराचे फोटो ह्यांना कुठून मिळाले. जे अजून मी ही बघितले नव्हते. अरे बातम्या करायच्या म्हणून कोणाच्याही घरचे फोटो द्याल? अशक्य थापाडी आहेत. ही न्यूज पोर्टल्स…,”असे म्हणत त्याने त्याच्या खास शैलीतच या फसव्या न्यूज वेब पोर्टल्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. चाहत्यांनी यावर राग व्यक्त केला आहे.

समीर चैगुले यांच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर त्यांचा आगामी चित्रपट ‘हवहवाई’ (Hawa Hawai) हा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांनी ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या चित्रपटात साकारलेली भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.(maharashtrachi-hasyajatra-comedian-samir-chaughule-angry-on-web-portal-news)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आली आली ‘फुलराणी’! अखेर सुबोध भावेच्या ती फुलराणी सिनेमाचा दमदार टिझर प्रदर्शित
भूमीला सर्वांसमोर किस करणारा तो पठ्ठ्या कोण? पुछता है भारत… मग वाचा ना बातमी, लगेच समजेल

हे देखील वाचा