Saturday, June 29, 2024

मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी

मागील काही काळापासून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवून हसवून वेड लावणाऱ्या वनिताने एक विनोदी अभिनेत्री अशी तिची ओळख कमावली. आज हीच वनिता येत्या २ फेब्रुवारी रोजी तिचा मित्र असणाऱ्या सुमित लोंढेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. मनोरंजनाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांनी लग्न केले. आता मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री असणारी वनिता खरात देखील लग्न करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिता येत्या २ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार असून सध्या तिचे लग्नाआधीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. नुकतीच वनिताची मेहेंदी झाली असून तिच्या मेहेंदीच्या समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वनिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वनिताने हातावर मेहेंदी काढलेली दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात शिवाली परब, चेतना भट्ट आदी होत्या. या दोघीनी देखील मेहेंदी काढली. शिवाली आणि चेतना यांनी वनिताचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याशिवाय सुमितने वनिताला त्याच्या हातावर मेहेंदी काढली. य सर्वांमध्ये विशेष म्हणजे “#su’MEET’vani” असा खास हॅशटॅग या सर्वानी वनिता आणि सुमितच्या फोटोंसाठी दिला आहे. अतिशय जवळच्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा २ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. त्याने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या प्री वेडींगचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पवन सिंगच्या ‘कमरिया पतरे पतरे’ गाण्याने केले रेकॉर्ड, यूटुबवर मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

हे देखील वाचा