Saturday, May 18, 2024

पवन सिंगच्या ‘कमरिया पतरे पतरे’ गाण्याने केले रेकॉर्ड, यूटुबवर मिळवले तब्बल ‘इतके’ कोटी व्ह्यूज

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता अशी ओळख असलेला पवनसिंग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईल आणि त्याचा अभिनय सर्वच लोकांना आवडतो. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करूनही पवनने संपूर्ण देशात त्याची ओळख निर्माण केली आहे. आपल्या गाण्याच्या माध्यमातून तो नेहमीच त्याच्या फॅन्सला भेटत असतो. त्याचे गाणे येणार हे ऐकल्यावरच त्याच्या फॅन्सचा उत्साह शिगेला पोहचतो. यातच आता त्याच्या नवीन गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले आहे.

पवनसिंगच्या ‘कमरिया पतरे पतरे’ या गाण्याने तर यूटुबवर एकच धमाका केला आहे. सुपरस्टार पवनसिंग आणि अभिनेत्री शिल्पी राज यांच्या ‘कमरिया पतरे पतरे’ या गाण्याला यूटुबवर २ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. केवळ ५० दिवसांमध्ये या गाण्याला एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. पवनसिंगच्या फॅन्सने त्याच्या या गाण्याला यूटुबवर ट्रेंडिंगमध्ये आणले आहे. या गाण्याने कमी वेळातच लोकांच्या तोंडी जागा मिळवली आहे.

पवन सिंग आणि दिव्या राल्हान स्टारर या गाण्यामध्ये अनेक बोल्ड सीन्स देखील आहेत. या गाण्यात पवन सिंग आणि दिव्या राल्हान स्टारर यांच्या बोल्ड मुव्हज फॅन्सला अधिक आकर्षित करत आहेत. हे गाणे प्रदर्शित होत असताना सुपरहिट होणार हे मानले जात होते. झाले पण तसेच गाण्याला मिळणार हा प्रतिसाद पाहून सर्वच लोकं खुश आहेत. पवन सिंग आणि शिल्पी राज यांच्या जोडीने पुन्हा एकदा कमाल करत लोकांना एक हिट गाणे दिले.

पावन सिंग आणि शिल्पी राज यांचे ‘कमरिया पतरे पतरे’ गाणे 11 डिसेंबरला प्रदर्शित केले गेले होते. या गाण्याने आतापर्यंत २ कोटी १३ लाख व्ह्यूज मिळवले आहेत. पवन सिंगचे सर्वच गाणे नेहमीच विविध रेकॉर्ड बनवत असतात. शिल्पीच्या आवाजाने देखील गाण्याला एक उंची मिळवून दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

 

हे देखील वाचा