Friday, March 14, 2025
Home मराठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची हळद दणक्यात पडली पार, बेभान होऊन नाचली नवरीबाई

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची हळद दणक्यात पडली पार, बेभान होऊन नाचली नवरीबाई

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री वनिता खरात आज (२ फेब्रुवारी) रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तिची लगीनघाई सध्या सुरु असून नुकतीच तिची हळद झाली. वनिता राहत असणाऱ्या वरळी येथील कोळीवाड्यामध्ये मोठ्या दणक्यात वनिताची हळद संपन्न झाली. तिच्या हळदीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, यात हास्यजत्रेमधील सर्वच कलाकार सहभागी झाल्याचे दिसत आहे. वनिताने अजून तिच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नसले तरी तिच्या मित्रमैत्रिणींनी मात्र सोशल मीडियावर तिला टॅग करत अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

यातच वनिताच्या हळद समारंभातील तिचा एक फोटो समोर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे. वनिताच्या हळदीच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि त्यावर पिवळ्या रंगाची फुलं असा एक सुंदर ड्रेस घातला होता. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सुमीतनेही तसाच सेम कुर्ता घातला होता. या हळदीच्या फॅक्शनमधले त्यांचे अनेक रोमॅंटिक पोजमधले फोटो समोर आले आहेत.

तत्पूर्वी वनिताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या चुड्याचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा दिसत असून, त्यातच तिने प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्ताराज’ कलेक्शनमधील गहू तोडे, मोती बांगडी घातलेली दिसली. याआधी गणिताच्या मेहेंदीच्या फंक्शनचे देखील फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले होते. वनिताच्या हळदीला शिवाली परब, चेतना भट, रोहित माने, नम्रता संभेराव आदी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

वनिता व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर असलेल्या सुमित लोंढेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. सुमित सोशल मीडियावर सक्रिय असून वनितासोबतही त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा