Monday, July 1, 2024

महिला आरक्षण विधेयकावर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘महिलांचा आदर करू शकत नाही तो..’

देशातील नवीन संसदेत मंजूर झालेले पहिले विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक, जे सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, अभिनेते आणि इतर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीही याला पाठिंबा देत आहेत. आधी प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत आणि आता चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी महिला आरक्षण विधेयकावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे.

यापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणौत, भूमी पेडणेकर, तमन्ना भाटिया आणि कीर्ती कुल्हारी यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचवेळी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट म्हणाले की, जो देश आपल्या महिलांचा आदर करू शकत नाही तो सुसंस्कृत समाज म्हणून ओळखला जाऊ शकत नाही. महिला आरक्षण विधेयकामुळे आपण खूप खूश आहोत आणि आशेचा पहिला किरण असल्याचे त्यांनी सांगितले. महेश भट्ट (Mahesh Bhatt) म्हणाले की, हा पहिला किरण आहे, आता सूर्य किती चमकतो ते पाहा.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे ऐतिहासिक असल्याचे सांगितले होते. त्याची जलद आणि प्रभावी अंमलबजावणी ही पुढची पायरी आहे, असे ती म्हणाली होती. मीडियावर या प्रलंबित विधेयकाच्या मंजुरीचे त्यांनी स्वागत केले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी नव्या पिढीला प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.

अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिनेही या विधेयकाचे कौतुक केले आणि हे देशासाठी एक विलक्षण विकास असल्याचे म्हटले. तिने या क्षणाच्या ऐतिहासिक स्वरूपावर भर दिला आणि सांगितले की तरुण पिढी आता लैंगिक समानतेच्या वातावरणात वाढेल. काही दिवसांपूर्वी संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात आले होते. (Mahesh Bhatt Reaction on Women Reservation Bill)

आधिक वाचा-
रितेश देशमुखचा पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, जिनिलियाची हटके प्रतिक्रिया, म्हणाली…
शाहरुखच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिस जिंकलं; 21व्या दिवशी जगभरात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

हे देखील वाचा