Thursday, June 13, 2024

रितेश देशमुखचा पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, जिनिलियाची हटके प्रतिक्रिया, म्हणाली…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टील प्रसिद्ध अभिनते आणि दिगर्शक रितेश देशमुख सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रितेश सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रितेशच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असता. नुकतेच रितेशने पत्नीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलियाने रितेशला दिलेली हटके प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

रितेशने (Riteish Deshmukh) हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जिनिलिया गप्पा मारताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला जिनिलिया रितेशला म्हणते, “ऐका, मी खूप वाईट आहे ना?” त्यावर रितेश म्हणतो, “तसं तर सर्व माहिती तुला असते, पण तरीही तुला माझ्याकडून ऐकायचं असतं ना.” त्यावर जिनिलिया काहीही न बोलता रितेशकडे बघत राहते.

हा व्हिडिओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बायकोला सर्व माहिती असते.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत. एकाने कमेंट केली आहे, “भाऊ संध्याकाळचे जेवण बाहेर करावे लागणार आज” तर दुसऱ्याने कमेंट करताना लिहिले की, “संपला विषय.” तर आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, “जिनिलिया- आज जेवण मिळणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश आणि जिनिलिया ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. या व्हिडीओमधूनही त्यांचे प्रेम दिसून येते. रितेश नेहमीच त्याच्या पत्नीबरोबरचे रोमँटिक आणि मजेदार क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Actor Riteish Deshmukh and actress Genelia DSouza video viral on social media)

आधिक वाचा-
रणबीर कपूरची एका महिन्याची कमाई पाहून व्हाल थक्क, करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे आलियाचा नवरा
लता मंगेशकर यांनी थेट ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युमनवर रोखली होती बंदूक, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा