Monday, July 8, 2024

श्वास रोखून धरा! पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी ‘दे धक्का २’ सज्ज, पण कधी होणार रिलीझ?

सध्या सिनेसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. कलाकार त्यांच्या नवीन सिनेमांच्या घोषणा करत आहेत, तर काही कलाकार त्यांच्या प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या सिनेमांच्या प्रमोशनमध्ये रमले आहेत. या बाबतीत मराठी सिनेसृष्टीनेही उडी घेतली आहे. मराठी सिनेमांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का २’ या आगामी मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

प्रसिद्ध हिंदी-मराठी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ‘दे धक्का २’ (De Dhakka 2) हा सिनेमा कधी जाहीर होणार आहे, हे पोस्ट शेअर करत सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘दे धक्का २’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, हा सिनेमा पुढील महिन्यात म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महेश मांजरेकर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज पंढरीची वारी, ५ ऑगस्टला लंडनवर स्वारी! महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’ तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. यावर नेटकरी कमेंट करत सांगत आहेत की, ते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “आता वाट पाहवत नाही.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “कॉमेडीचा डबल डोस= दे धक्का २.”

तब्बल १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ सिनेमा
विशेष म्हणजे, ‘दे धक्का’ हा सिनेमा १४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. या सिनेमात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, अतुल काळे यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज! सलमान-रितेश दिसणार एकाच चित्रपटात?

छोटी परीही रमली विठ्ठल भक्तीत! क्यूट व्हिडिओ शेअर करत म्हणतेय, ‘सुखी ठेव मित्रांना’

अगंबाई ऐकावं ते नवलंच ! ‘या’ कारणामुळे राधिका आपटेकडे नाही लग्नाचा एकही फोटो

हे देखील वाचा