‘बिग बॉस मराठी‘चे(Bigg Boss Marathi) तिसरे पर्व खूपच चर्चेत राहिले आहे. अनेक रियॅलिटी शो आणि मालिका यांना मागे सारत या शोने टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले. तब्बल दोन वर्षांनी हे पर्व आल्यामुळे सुरुवातीपासूनच सगळेजण याची वाट बघत होते. या शोमधील स्पर्धक तर चर्चेत आहेतच. परंतु शोचे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील सगळ्यांच्या चर्चचा विषय आहे. मागील दोन्ही पर्व त्यांनी होस्ट केले आहेत. सगळ्यांना त्यांचे होस्टिंग खूप आवडते. अशातच अशी माहिती आली आहे की, महेश मांजरेकर हा शो सोडणार आहेत.
महेश मांजरेकर यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी या शोमधून ब्रेक घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा शो संपायला आता अवघे ११ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि अशातच ही बातमी समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या जागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा शो होस्ट करणार असल्याची बातमी आली आहे. मागील वीकेंडच्या चावडीवर त्यांनी या गोष्टीची माहिती दिली होती. तसेच मागील रविवारचा एपिसोड देखील सिद्धार्थ जाधवने होस्ट केला होता. (Mahesh Manjrekar exit from bigg Boss Marathi 3, due to health issue)
काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर यांना कर्करोग झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या ‘अंतिम’ या चित्रपटाची शूटिंग करताना त्यांच्यावर किमोथेरपी चालू होती. तसेच आता देखील त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी या शोमधून ब्रेक घेतला आहे.
‘बिग बॉस’चा ग्रँड फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार आहे. हा शो संपल्यावर त्या जागी ‘तुझ्या रुपाच चांदणं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो देखील व्हायरल होत आहे. प्रोमो पाहून लक्षात येत आहे की, ही मालिका वर्णभेदावर आधारित आहे.
हेही वाचा :
‘कोई एसी तो ऑन करो भाई,’ अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकवर ‘ही’ अभिनेत्री देखील फिदा
साताजन्माच्या गाठी! २०२१ मध्ये ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी थाटला संसार, यादीवर टाका नजर
टेलिव्हिजनवरील ‘या’ दोन सह-कलाकारांनी बांधली लगीनगाठ, अभिनेत्याचे आहे दुसरे लग्न