नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’


आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर यांनी अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचे देखील सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं आगळं वेगळं शीर्षक असलेला हा चित्रपट येत्या २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता या सिनेमात नेमके कोणते कलाकार झळकणार? कोणती भूमिका साकारणार? आदी अनेक प्रश्न रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.


मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून, अभिनयही केला आहे. काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, ६६ सदाशिव आदी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहेत. बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव परिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सध्या महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन करत होते, मात्र तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी हा शो सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांनी हा शो मध्येच सोडावा लागला आहे. महेश मांजरेकर यांच्याजागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावताना दिसत आहे.
महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट ही त्याला अपवाद नसेल. २१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना यांचा लाडका मुलगा तैमूर झाला पाच वर्षांचा, त्याला सांभाळताना बेबोला येतो घाम

तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श

‘केस विंचरायला विसरली वाटतं!’, विमानतळावर काजोलचा विचित्र लुक नेटकऱ्यांनी विचारले तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न 


Latest Post

error: Content is protected !!