‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील सुमन आठवतीये का? ५२ व्या वर्षी देखील दिसतेय एवढी सुंदर


सलमान खानसारख्या सुपरस्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. तिने 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले होते. या चित्रपटानंतर ती जास्त काही चित्रपटात चालली नाही. पण ती सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. प्रत्येक दिवशी ती तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. अशातच आता तिने नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

भाग्यश्रीचे वय आज 52 आहे, पण ती अजूनही तितकीच तरुण आणि सुंदर दिसते. नुकतेच भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. जे पाहून तिचे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून स्वतः ला थांबवू शकत नाहीत. हे फोटो व्हेकेशनमधील आहेत. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करत असते. ती सध्या उदयपूरला गेली आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे. (Maine pyar Kiya fame actress bhagyashree share her vacation photo on social media)

दुसऱ्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जीन्स घातली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो बघून समजत आहे की, ती तिच्या सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेत आहे.

तिच्या मागे बॅकग्राऊंडला एक सुंदर हत्तीची पेंटिंग लावलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी माझ्या देशात प्रवासी नाहीये, पण फिरण्याचा पूर्ण आनंद घेत आहे. भारतात सगळं काही आहे.”

हे फोटो शेअर करून तिने सांगितले आहे की, हे फोटो उदयपूरमधील फतेह महालाचे आहेत. उदयपूर हे त्याच्या सुंदरतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. या फोटोसोबत तिने तिच्या हॉटेल रूममधील झलक देखील व्हिडिओमार्फत तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतं आहेत. सगळेजण प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या वयातही ती एवढी सुंदर दिसते, याचे कौतुक करत आहेत.

भाग्यश्री खूप दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने हिंदीसोबत कन्नड, मराठी, भोजपुरी आणि बंगाली चित्रपटात देखील काम केले आहे. ती लवकरच हिंदी चित्रपटात परत येणार आहे. ती ‘राधेश्याम’ आणि कंगना रणौतसोबत ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.