Friday, March 14, 2025
Home मराठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील कलाकारांचा मुख्यमंत्र्यांकडून ‘माझा पुरस्कारा’ने गौरव; विनोदवीर समीर चौघुलेने केले फोटो शेअर

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील कलाकारांचा मुख्यमंत्र्यांकडून ‘माझा पुरस्कारा’ने गौरव; विनोदवीर समीर चौघुलेने केले फोटो शेअर

आपल्या अभिनयाने आणि विनोदाने सर्वांना खळखळून हसवण्यासाठी अनेक कलाकार नेहमीच सज्ज असतात. अनेक विनोदी कार्यक्रम टेलिव्हिजनवर चालू असतात. अशीच प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात नेऊन सोडणारा सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ होय. यातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक अव्वल आहेत. कोरोना काळात जेव्हा प्रत्येकजण चिंतेत होते, तेव्हा हेच ते कलाकार होते ज्यांनी काही अंशी का होईना त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांच्या दुःखाचे निवारण केले होते. याचसाठी महाराष्ट्राची हास्य जत्रामधील सर्व कलाकारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा ‘माझा पुरस्कार’ देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा अशोक मुळ्ये यांच्या ‘माझ्या पुरस्कारा’चे १२ वे पर्व होते. या पुरस्कारासाठी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यादरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रामधील विनोदवीर समीर चौघुलेने या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाकारांना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा ‘माझा पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करताना दिसत आहेत. हा आनंदाचा क्षण साजरा करताना सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले आहे. फोटोत सर्वांनी मास्क घातलेला दिसत आहे.

समीर चौघुलेने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “कोव्हिड काळात रसिकांना हास्य थेरपी देण्याचे काम आमच्या हास्य जत्रेच्या कुटुंबाने अत्यंत प्रामाणिकपणे केलं. रसिक प्रेक्षकांनी आम्हाला अगणित मेसेज करून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कला क्षेत्रात एक स्पष्टोक्ता वरवर तिरकस वाटणारा पण तेवढाच सरळ असलेला कला महर्षी अशोक मुळ्ये काका यांची ही शाब्बासकी हास्य जत्रेला मिळाली. यंदाचा माझा पुरस्कार हास्य जत्रेला मिळाला. मा. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. काल वर्षावरील मुख्यमंत्री साहेबांसोबतचा एक तास अविस्मरणीय होता. मुळ्ये काका धन्यवाद. रसिक प्रेक्षकहो धन्यवाद आपल्या शिवाय हे अशक्य, थॅंक यू.”

त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सगळेजण त्यांना सोशल मीडियावर कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत. अनेक कलाकार तसेच प्रेक्षक महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या टीमला शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा