मराठी सिनेसृष्टीत ज्याप्रमाणे सध्या अनेक कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. त्याचप्रमाणे अनेक बालकलाकारांच्या बाललिलाही प्रेक्षकांना चांगल्याच आवडत आहेत. यामध्ये छोट्या पडद्यावरील बालकलाकार मायरा वैकुळचे (Maira Vaikul) नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या बाललिलांनी आणि अभिनयाने परी म्हणजेच मायराने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. ती सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम करत असून नुकतीच परीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून तिने तिच्यासाठी कोणता दिवस खास आहे याबद्दलचा खुलासा केला आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील बालकलाकार परी म्हणजेच मायरा वैकुळ घराघरात लोकप्रिय आहे. तिचा सुंदर अभिनय आणि बाललिला माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. अलिकडेच मायराने सोशल मीडीया पोस्टवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा प्रवास मांडला असून तिच्या या मालिकेला एक वर्ष पुर्ण झाल्याचेही तिने सांगितले आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये मायराने “आज २८ जुलै. आजचा दिवस खरंच खुप स्पेशल आहे. कारणही तसेच स्पेशल आहे. खरंतर मायराचा जन्म २२ जानेवारी २०१७ झाला. पण आपल्या लाडक्या परीचा मात्र जन्म हा २८ जुलै २०२१ ला झाला.आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी “माझी तुझी रेशीमगाठ” चा पहिला प्रोमो टीव्ही वरती टेलिकास्ट झाला. आणि तो होता ” काय म्हणणं आहे?” त्या नंतर मायराला जे तुम्ही प्रेम दिलं आहे, प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आम्ही, आमचं पूर्ण कुटुंब तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे आयुष्यभर ऋणी राहील. तुमचे प्रेम आपल्या लाडक्या परीसोबत असेच राहील अशी अपेक्षा,” असे म्हणत आपला प्रवास मांडला आहे.
दरम्यान परीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्याही जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळायला आहेत.
हेही वाचा –
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन: चित्रपटांसाठी खऱ्याखुऱ्या वाघांशी लढणारे अभिनेते!धक्कादायक! मुंबईतील सिनेमा सेटला लागली भीषण आग, दूरवर पसरले धुरांचे लोटबाबो! विद्या बालनने शेअर केले बेडरुम सिक्रेट; म्हणतेय, ‘मला सेक्स केल्या केल्या…’










