Thursday, March 28, 2024

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन: चित्रपटांसाठी खऱ्याखुऱ्या वाघांशी लढणारे अभिनेते!

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून, भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. परंतु दुर्दैवाने, शिकारी आणि शहरीकरण यासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे वाघ मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहेत. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या वाघांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी, दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन पाळला जातो.

गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांमध्येही वाघ मोठ्या प्रमाणावर दाखवले गेले आहेत. परंतु सध्याच्या काळात जंगली प्राणी मोठ्या पडद्यावर दाखवायचे असतील, तर VFXचा वापर केला जातो. मात्र पुर्वी खऱ्या प्राण्यांसोबत शूटिंग केले जायचे. चला तर मग अशा काही चित्रपटांवर एक नजर टाकूया, ज्यात कलाकारांनी चित्रपटांसाठी खऱ्या वाघांशी लढा दिला. (international tiger day actors who fought real tigers for film)

अमिताभ बच्चन- ‘खून पसीना’ (१९७७)
या चित्रपटातील बहुतांश अ‍ॅक्शन सीन्स एडिटेड होते. मात्र, चित्रपटातील सर्वात लक्षणीय सीनपैकी एक, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रेखाला (Rekha) वाचवण्यासाठी वाघाशी लढताना दिसत आहेत. चित्रपटातील हा सीन त्या काळी खूप पसंत केला गेला होता.

धर्मेंद्र- ‘आझाद’ (१९७८)
धर्मेंद्र (Dharmendra) यांनी १९७८च्या ‘आझाद’ चित्रपटात खऱ्या वाघाशी लढा दिला होता, ज्यामध्ये हेमा मालिनी (Hema Malini) देखील होत्या. यासाठी खास वाघ आणला होता. चित्रपटाच्या एका सीनमध्ये धर्मेंद्र हेमा मालिनीला वाचवायला जातात, अचानक तिथे एक वाघ येतो आणि त्यानंतर दोघांमध्ये लढाई होते.

मिथुन चक्रवर्ती- ‘हम से है जमाना’ (१९८३)
‘हम से है जमाना’ हा मिथुन चक्रवर्तीच्या (Mithun Chakraborty) सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. यात त्यांच्यासोबत झीनत अमानने (Zeenat Aman) अभिनय केला होता. जेव्हा झीनतचे पात्र जंगलात शिकारीला जाते, तेव्हा वाघ तिच्यावर हल्ला करतो आणि त्यानंतर मिथुन तिथे येऊन वाघाशी लढतात, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

अजय देवगण- ‘हिम्मतवाला’ (२०१३)
अजय देवगणने (Ajay Devgan) या चित्रपटात एका खर्‍या वाघाशी लढा दिला होता, हे या रिमेकचे एक खास आकर्षण आहे. लढाईच्या सीन संबंधित कोणताही वाद टाळण्यासाठी, हा सीन मॉरिशसमध्ये शूट करण्यात आला.

अक्षय कुमार- ‘सिंग इज ब्लिंग’ (२०१५)
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) सर्व स्टंट स्वत: करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा असाच एक चित्रपट म्हणजे ‘सिंग इज ब्लिंग’, ज्यामध्ये अभिनेत्याने मुफासा नावाच्या सिंहासोबत एक सीन केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा