Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ ठिकाणी होणार नेहा आणि यशच्या ग्रँड वेड्डींगचं शूट, पार पडणार टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा लग्नसोहळा

मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सध्या ट्रेंडिंगमध्ये असून, यातील झी मराठीवरील एक मालिका जोरदार चर्चेत आहे. ती मालिका म्हणजे ‘तुझी माझी रेशीमगाठ‘. (majhi tujhi reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कलाकार देखील चांगलेच लोकप्रिय आणि चर्चेत आहेत. प्रार्थना बेहेरे, (prathna behere) श्रेयस तळपदे, (shreyash talpade) संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी यांसारखे नावाजलेले कलाकार मालिकेत दिसत असल्याने मालिकेला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. यासोबत या मालिकेत असणारी चिमुकली अभिनेत्री मायरा वैकुळ (myra vaikul) या मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

मालिकेत लवकरच आपल्याला आनंदाचे क्षण पाहायला मिळणार आहे. मालिकेत नेहा आणि यशचे लग्न झालेले पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या साखरपुड्याचे प्रोमो व्हायरल होत आहे. साखरपुडा देखील अगदी धूमधडाक्यात साजरा झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना त्यांचा लग्नाची ओढ लागली आहे. नेहा आणि यशची जोडी सगळ्यांना खूप आवडते. त्यामुळे आता मालिकेत त्यांचे लग्न कधी होणार आणि कसे होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचे अगदी ग्रँड लग्न दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सगळेच उत्सुक आहेत. सिल्व्हासा येथे त्यांचे लग्न होणार आहे, याआधी मराठी टेलिव्हिजनवर तुला पाहते रे या मालिकेत ईशा आणि विक्रांत यांचे ग्रँड लग्न दाखवले होते. नेहा आणि यश यांचे हे दुसरे ग्रँड लग्न असणार आहे. त्यामुळे आता या लग्नात नक्की काय दाखवण्यात येणार आहे. हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा