हॉट स्टाईलमध्ये पोझ देत, रसिकाने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष; फोटो पाहून उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

majhya navryachi bayko fame rasika sunil shared her hot photo on instagram


‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे नाव घेतले तर गुरुनाथ नंतर लगेचच शनायाची आठवण येते. शनाया अर्थातच अभिनेत्री रसिका सुनीलची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही, यातील पात्रं नक्कीच चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. शनाया सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांशी संपर्कात राहते. शिवाय ती आपले फोटो शेअर करून, नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते.

नुकताच रसिकाने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये रसिका अतिशय हॉट अंदाजात पोझ देताना दिसली आहे. यात तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे. नेहमीप्रमाणेच यात रसिकाचा फॅशन स्टेटमेंट पाहायला मिळत आहे.

फोटो शेअर करून, तिने हा थ्रोबॅक फोटो असल्याचे सांगितले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “या फोटोमध्ये असलेल्या ठिकाणाचे नाव.” या फोटोवर आता मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कंमेट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक भरभरून कौतुक केले जात आहे.

रसिकांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये भूमिका साकारत टीव्हीच्या जगात पाऊल ठेवले. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.