Sunday, February 23, 2025
Home मराठी ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम करून, अभिनेत्री रुचिरा जाधवने बरीच वाहवा मिळवली. यात तिचे पात्र लहान असले, तरीही ते चांगलेच प्रसिद्ध झाले होते. रुचिरा जाधव सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इतकेच नव्हे, तर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेट बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. नुकतेच रुचिराने शेअर केलेले काही फोटो अवघ्या सोशल मीडियावर आग लावताना दिसत आहेत. (majhya navryachi bayko fame ruchira jadhav’s hot photo)

रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे. यात रुचिराने निळ्या रंगाची नाईटी परिधान केली आहे. फोटोमध्ये ती बेडवर बसलेली दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात रुचिराने किती हॉट स्टाईलमध्ये पोझ दिली आहे. तिच्या या मादक फोटोने चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

रुचिराने ही पोस्ट शेअर करताच, ती व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. यातील तिचा घायाळ करणारा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तुम्ही पाहू शकता की अगदी कमी वेळात या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या फोटोवर ३८ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे. सोबतच नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत.

रुचिराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत झळकली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती, जिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिने ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ यासारख्या अनेक मालिकांमध्येही रुचिका दिसली आहे. शिवाय तिने ‘लव लफडे’, ‘सोबत’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास

हे देखील वाचा