मकरंद अनासपुरे यांनी केला आंतरजातीय विवाह, पत्नी देखील आहे अभिनेत्री


मराठी चित्रपटसृष्टी आणि विनोद यांचा जवळचा संबंध आहे. मराठीमध्ये अनेक विनोदी चित्रपट आले आहेत. तसेच अनेक विनोदी कलाकार होऊन गेले आहेत. याच यादीतील एक नाव म्हणजे मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure). त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी व्यक्तिरेखा निभावल्या आहेत. त्यांचा असा एकही चित्रपट नसेल, जिथे त्यांचा विनोदी स्वभाव समोर आला नाही. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत अनेकांना माहिती आहे. परंतु या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकांना माहिती नाहीये. ही गोष्ट तर कित्येक लोकांना माहित नसेल की, मकरंद अनासपुरे यांची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे आणि खास गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम देखील केले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या पत्नीबाबत अधिक माहिती…

मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीचे नाव शिल्पा अनासपुरे हे आहे. तसं पाहायला गेलं, तर शिल्पा आणि मकरंद यांचा प्रेमविवाह आहे. चित्रपटात नेहमीच अवखळ आणि मस्तीच्या अंदाजात दिसणारा हा कलाकार प्रेमविवाह करेल असे अनेकांना वाटले देखील नव्हते. शिल्पा आणि मकरंद यांची पहिली भेट २००० साली झाली. त्यावेळी ‘जाऊबाई जोरात’ या नाटकाचे प्रयोग चालू होते. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली. हळूहळू गाठीभेठी वाढत गेल्या आणि मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या. त्यानंतर त्यांनी शिल्पा यांना थेट लग्नाची मागणी घातली होती. (Makarand anaspure’s wife is also actress, doing four film together)

प्रेम जरी असले तरी देखील घरच्यांच्या परवानगीने त्यांनी विवाह केला आहे. खास गोष्ट म्हणजे त्या दोघांचा आंतरजातीय विवाह आहे. परंतु तरी देखील त्यांच्या दोघांच्याही कुटुंबाकडून कोणताच नकार आला नाही आणि त्यांनी सगळ्यांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने लग्न केले. त्यांनी २००१ साली त्यांच्या गावाला औरंगाबादमध्ये लग्न केले. त्या दोघांना आता दोन मुली आहेत.

मकरंद आणि शिल्पा यांनी चार चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या दोघांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘तुका तुकविला नाग्या नाचविला’, ‘सुंबरान’, ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

हेही वाचा :

‘या’ प्रसिद्ध कलाकारांसाठी हे वर्ष ठरले अविस्मरणीय; जाणून घ्या कारणे

ग्लॅमर इंडस्ट्रीचे घाणेरडे सत्य सुरवीन चावलाने आणले बाहेर, बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चालते कास्टिंग काऊच

‘या’ दहा वेबसिरीजने २०२१ वर्षात मिळवली तुफान लोकप्रियता

 

 


Latest Post

error: Content is protected !!