‘या’ प्रसिद्ध कलाकारांसाठी हे वर्ष ठरले अविस्मरणीय; जाणून घ्या कारणे

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसाठी हे २०२१ चे वर्ष कोणत्या ना कोणत्या कारणाने अविस्मरणीय ठरले आहे. बऱ्याच घटनांनी यावर्षी इतिहास रचला आहे. काही सेलिब्रिटींनी आपल्या अभिनयाच्या आणि चांगल्या कामाच्या जोरावर चाहत्यांचा मने जिंकली, तर काहींचे वर्ष वादांना सामोरे जाण्यातच गेले. या वर्षात अनेक घडामोडी घडल्या आणि त्याच्या जोरदार चर्चाही रंगल्या. या लेखात कोणाच्या आयुष्यात काय घडले आणि याच्या चर्चा काय झाल्या हे आपण जाणून घेऊया.

शहनाझ गिल (Shehnaaz Gill)
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे सप्टेंबरमध्ये निधन झाले. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड बिग-बॉस फेम शहनाझ गिल खूपच चर्चेत आली होती. सिद्धार्थच्या निधनानंतर बरेच दिवस शहनाझ सोशल मिडियावर सक्रिय दिसली नाही. त्या काळात तिने एकही फोटो शेअर केला नव्हता. तिला धीर देण्याचा अनेक चाहत्यांनी प्रयत्न केला. अशातच तिचे ‘तू यही है’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यानंतर ती अजूनच चर्चेत आली. (most contreversal celebrities in 2021)

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

आर्यन खान (Aryan Khan)
मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मुंबईतील क्रुझ पार्टीमुळे चर्चेत आलेल्या आर्यनला हे वर्ष चांगलेच लक्षात राहणार आहे. आर्यनला अं’मली पदार्थ घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या घटनेला अनेकदा राजकीय वळण मिळालेले दिसले. त्यामुळे हा मुद्दा बराच चर्चेत राहिला.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

अनन्या पांडे (Ananya Panday)
आर्यन खानच्या कारवाईदरम्यान त्याचे सर्व फोन रेकॉर्ड काढण्यात आले. यामध्ये चंकी पांडेंची मुलगी अनन्या पांडेचे नाव समोर आले. आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांचे ड्रग्जसंबंधीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले होते. या प्रकरणामुळे एनसीबीने अनेक अभिनेत्रींची कसून चौकशी केली होती. हे प्रकरण बरेच गाजल्याने अनन्या आणि इतर अनेक अभिनेत्रीही चर्चेत आल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

राज कुंद्रा (Raj Kundra)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रादेखील क्राइम ब्रांचच्या रडारवर होता. पॉर्नोग्राफी व्हिडिओप्रकरणी पोलिसांनी राजला ताब्यात घेतले होते. अश्लील चित्रपट बनवून एका ऍपच्या माध्यमातून ते प्रदर्शित करण्याचे काम राज करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

कंगना रणौत (Kangana Ranaut)
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत या वर्षी देखील मागे राहिली नाही. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्याची भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असल्याचे वादग्रस्त विधान तिने केले होते. कृषी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेदेखील कंगनाला ट्रोल करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

जॅकलीन फर्नांडिस
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस चर्चेत आली होती. ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी करण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

२३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की, जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचे काही फोटो व्हायरल झाल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा-

Latest Post