Year Ending 2021: ‘या’ दहा वेबसीरिजने २०२१ मध्ये मिळवली तुफान लोकप्रियता, काही नावे तुमच्याही आवडीची


चित्रपटांना उत्तम पर्याय म्हणून वेबसिरीजकडे पाहिले जाते. कोरोनाकाळात चित्रपटगृह बंद असताना वेबसिरीज हे एकमेव माध्यम प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वेबसिरिजला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून अनेक बॉलिवूडमधील मोठमोठे चेहरे या माध्यमाकडे आकर्षित झाले आहेत. याशिवाय अनेक बॉलिवूडमधील अपयशी कलाकारांना ठरणारे माध्यम म्हणून देखील वेबसिरीजची ओळख बनली आहे. अतिशय वेगवेगळ्या आणि पठडीबाहेरील विषयांवर वेबसिरीज तयार होतात. त्यामुळे अशा वेबसिरीज बघणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. आता आपण २०२१ वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आले होत. लवकरच २०२१ ला अलविदा म्हणत आपण २०२२ मध्ये प्रवेश करणार आहोत. या २०२१ वर्षात अनेक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यात काही नवीन होत्या तर काही सिरीजचे पुढचे भाग प्रदर्शित करण्यात आले. आज या लेखातून जाणून घेणार आहोत अशा दहा वेबसिरीज ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

स्पेशल ऑप्स :
केके मेनन, आफताब शिवदासानी, आदिल खान, विनय पाठक अभिनित ‘स्पेशल ऑप्स’ सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. नीरज पांडे आणि शिवम नायर दिग्दर्शित ही सिरीज एक ऍक्शन थ्रिलर ड्रामा सिरीज होती. या सिरीजच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

आर्या २ :
सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘आर्या २’ नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आताच प्रदर्शित झालेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

अरण्यक :
रवीना टंडनची पहिली वेबसिरीज असणारी अरण्यक सिरीज १० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरिजला देखील तुफान प्रतिसाद मिळत आहे.

हाऊस ऑफ सिक्रेट्स :
दिल्लीमधील एकाच घरातील ११ व्यक्तींच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. याच घटनेवर आधारित हाऊस ऑफ सिक्रेट्स ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली तिला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

फॅमिली मॅन २:
मनोज बाजपेयी आणि समंथा रूथ प्रभू यांची फॅमिली मॅन २ ह्या सिरीजची सर्वच लोकांना प्रतीक्षा होती. या सिरिजला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

मनी हाईस्ट ५:
यावर्षातील सर्वात जास्त बहुप्रतिक्षित सिरीज म्हणून या सिरीजचे नाव येईल. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरिजला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

गुल्लक :
एक सीजन आधीच प्रदर्शित झालेल्या या सिरीजच्या दुसऱ्या पर्वाची सर्वांनाच उत्सुकता होती. कौटुंबिक ड्रामा असलेल्या या सिरिजला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

एस्पिरेंट्स :
‘एस्पिरेंट्स’च्या पहिल्या पर्वाला यूट्यूबवर प्रदर्शित केले गेले. यात जीवनात येणारे अनेक उतार आणि चढाव दाखवले गेले आहेत.

तांडव :
सुरुवातीला मोठ्या वादात अडकलेल्या या सिरीजवर मोठ्या प्रमाणात टीका झाली मात्र नंतर ही सिरीज प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी ठरली.

स्क्विड गेम :


संपूर्ण जग ज्या सिरीजची वाट बघत होते, ती सिरीज म्हणजे स्क्विड गेम. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा :

हेही पाहा-


Latest Post

error: Content is protected !!