Friday, April 19, 2024

‘स्क्विड गेम’च्या दिग्दर्शकांनी केला दहा वेळा रिजेक्शनचा सामना, आज संपूर्ण दुनियेत त्यांच्याच ‘वेबसीरिज’चा डंका

आजवर नेटफ्लिक्सवर तुम्ही अनेक भयभीत करणाऱ्या वेबसीरिज पाहिल्या असतील, पण ‘स्क्विड गेम’ या सीरिजची बातच और आहे. या सीरिजमध्ये दाखवला जाणारा खेळ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यामध्ये अनेक वेळा लोकांना मारुन टाकले जाते. सारखे लोकांचे ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात. अशात या सर्वांमध्ये अनेकांचे बेकार पद्धतीने जीव जातात. या गेममध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला ४५.६ बिलियन साऊथ कोरिअन वॉन म्हणजेच २,८६,११,०८,३६० एवढे रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

सध्या या वेबसीरिजने सर्वांनाच वेड लावले आहे. कल्पनेच्या पलीकडचे जग या सीरिजमधून पाहायला मिळते. लहान मुले खेळतात. तशा एका गेमवर एवढा विद्ध्वंस पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकही खूप खुश आहेत. सर्वजण या वेबसीरिजला खूप प्रेम देत आहेत. अनेकांनी, तर याच्या दुसऱ्या सिझनची देखील मागणी केली आहे.

परंतु या वेबसीरिजला आधी १० वेळा नकार ऐकावा लागला होता. होय १० वर्षे नकार. कसे आहे कोणत्याही मोठ्या आणि छान गोष्टीला सुरुवातीला पराभव पत्करावाच लागतो. या वेबसीरिजचे दिग्दर्शक हवांग यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मेहनत घेतली. त्यांना ही कल्पना १० वर्षे आधी सुचली होती. त्यावेळी ते त्यांच्या आईबरोबर आणि आजीबरोबर राहत होते. अनेकांना सुरुवातीला ही कहाणी खूप विद्ध्वंसक आणि लोकांच्या मनावर चुकीचा परिणाम करणारी वाटली. काहींना असे वाटले की, ही स्टोरी चालणार नाही. लोकांना असे पाहायला आवडणार नाही, पण जेव्हा वेबसीरिज सुरू झाली, तेव्हा सर्वच काया पालटली.

दिग्दर्शक हवांग यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक असाही काळ आला जेव्हा त्यांच्याकडे काहीच पैसे न उरल्याने त्यांना स्वतःचा लॅपटॉप विकून लिखाण थांबवावे लागले. परंतु एवढ्या अडचणींनंतर अखेर नेटफ्लिक्सवर ही स्टोरी चांगलीच चालली. १७ सप्टेंबरपासून ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

हे देखील वाचा