Wednesday, June 26, 2024

संसार मोडलाय पण नातं काही संपेना, घटस्फोटित असूनही आजही एकत्र दिसतात ‘या’ जोड्या

बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून चित्रपट निर्माता करण जोहरच्या जंगी पार्टीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या पार्टीला बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. पण या सर्वांमध्ये आमीर खान आणि किरण रावच्या हातात हात घालून केलेल्या एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. कारण काही दिवसांपूर्वीच दोघांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोट घेवूनही दोघे एकत्र फिरत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. इतकेच नव्हेतर नेटकऱ्यांनी दोघांना जोरदार ट्रोलही केले होते. पण बॉलिवूड जगतात हा  प्रकार काही नवीन नाही. असे अनेक कलाकार आहेत जे घटस्फोट घेऊनही आजही एकत्र फिरताना दिसत असतात. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

ऋतिक रोशन :सुजैन खान– १३ वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर ऋतिक रोशन आणि सुजैन खानने घटस्फोटाचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. ऋतिक आणि सुजैन २००० मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण सध्या त्यांचे पती पत्नीचे नाते नसले तरी दोघांच्यात मैत्री मात्र कायम आहे. म्हणूनच आजही दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. दोघांना दोन मुलेही आहेत. दोघेही अनेकदा एकत्र फिरायला गेलेलेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अरबाज खान : मलायका अरोराघटस्फोट होऊनही एकत्र दिसणाऱ्या जोडीमध्ये मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मलायका आणि अरबाजलाही एक मुलगा आहे. दोघांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले असले तरी आजही ते एकत्र फिरताना दिसत असतात. अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या आणि अर्जुन कपूरच्या प्रेमप्रकरणामुळे नेहमीच चर्चेत येत असते. पण आजही तिचे आणि अरबाज खानचे मैत्रीचे संबंध आहेत.

फरहान अख्तर :अधुना भाबानी-  बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने 2000 साली सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानीसोबत लग्न केले. पण, 16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. दोघांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. विशेषत: मुलींच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघे एकत्र दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा