Saturday, April 20, 2024

मलायका अरोरासोबतच्या लग्नाच्या बातमीवर आली अर्जुन कपूरची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला अभिनेता

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. त्यामुळेच या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्याही सतत कानावर येत असतात. अलीकडेच अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाच्या बातमीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आता या बातमीवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

खरं तर, अलीकडेच या दोन्ही स्टार्सच्या लग्नाच्या बातम्यांनी प्रचंड जोर पकडला आहे. दरम्यान, बुधवारी (१८ मे) अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर इशाऱ्यांमध्ये या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “माझ्यापेक्षा इतर लोकांना माझ्या आयुष्याबद्दल अधिक माहिती कशी आहे, याच्या मी प्रेमात आहे.” अर्जुन कपूरची ही पोस्ट अलीकडच्या काळात सुरू असलेल्या त्याच्या लग्नाच्या बातम्यांशी जोडली जात आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवरून लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. (arjun kapoor reaction on reports of his wedding with malaika arora)

नुकतेच मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही आता त्या टप्प्यावर आहोत, जिथे आम्ही पुढे जाण्याचा विचार करू शकतो.” ती म्हणाली होती, “आम्ही गोष्टींवर खूप चर्चा करतो. आम्ही खरोखरच एकमेकांना प्रेम करतो. आम्ही परिपक्व टप्प्यावर आहोत.”

लग्नाबद्दल काय आहे बातमी?
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं माध्यमांमध्ये म्हटलं जात आहे. दोघे इंटिमेट वेडिंग प्लॅन करत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. या लग्नात मलायका लेहेंगा नाही तर साडी परिधान करताना दिसणार आहे, तर अर्जुन कपूर कुर्ता आणि पँटमध्ये दिसणार आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच अर्जुन कपूरच्या पोस्टवरून या बातम्या फक्त अफवा असल्याचं लक्षात येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा