Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ४८ वय असूनही गजब दिसते मलायका अरोरा, जाणून घ्या तिचे फिटेनस सिक्रेट

४८ वय असूनही गजब दिसते मलायका अरोरा, जाणून घ्या तिचे फिटेनस सिक्रेट

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या स्टाईल, फॅशन आणि फिटनेससाठी खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर, आपण नेहमी तिचे एकापेक्षा एक उत्कृष्ट फोटो पाहतो, जे केवळ चाहत्यांचीच नाही तर सेलिब्रिटींचीही मनं जिंकतात. दुसरीकडे, मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण मुलीपेक्षा कमी नाही. ४८ वर्षीय मलायकाचे फोटो १६ वर्षीय तरुणीपेक्षा कमी नसतात. त्याचबरोबर अभिनेत्रीला तिच्या फिटनेसचे रहस्य विचारण्यासाठी महिला सतत कमेंटही करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मलायकाच्या फिटनेसचे रहस्य घेऊन आलो आहोत.

मलायकाचे सिक्रेट्स
फिटनेस आयकॉन मलायका अरोरा स्वत:ला फिट, स्मार्ट, आकर्षक आणि उत्साही ठेवण्यासाठी योगा करायला विसरत नाही. तिच्या इंस्टाग्रामवरही तिच्या योगाचे अनेक व्हिडिओ आहेत. जे लोकांना खूप प्रेरणा देतात. चला तर मग आज जाणून घेऊया मलायकाचे फिटनेस सिक्रेट. (malaika arora 4 enchanting yoga postures you must follow then you will like sweet 16)

झपाट्याने करा वजन कमी
तुम्ही मलायकाला नटराजासन करताना पाहिले असेलच. नटराजासनामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते, असा यामागील तर्क आहे. या आसनामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

गौमुखासन
गौमुखासनामुळे तुमचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हे आसन सतत केल्याने तुमच्या हाताची चरबी बरीच कमी होईल.

मत्स्यासन
या आसनाचा सराव मान आणि पाठ वाकवून केला जातो. यामुळे फुफ्फुसे तंदुरुस्त राहतात आणि पोटाची चरबीही झपाट्याने कमी होते

नौकासन
तुम्ही मलाइकाला अनेकवेळा नौकासन करताना पाहिले असेल. हे करणे जितके सोपे दिसते तितकेच अवघड आहे. या आसनाचा आकार काहीसा बोटीसारखा आहे. त्यामुळे पोट, पाय आणि हाताची चरबी झपाट्याने कमी होते.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा