Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड ब्रेकअपच्या अफवांनंतर पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले मलायका आणि अर्जुन, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

ब्रेकअपच्या अफवांनंतर पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले मलायका आणि अर्जुन, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमधील पावर कपल अशी ओळख असलेले जोडपे अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि मलायका अरोरा (malaika arora) यांचे ब्रेकअप झाले आहे, अशा अफवा पसरत होत्या. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून या सगळ्या बातम्या खोट्या असल्याची माहिती दिली. या अफवांनंतर आता पहिल्यांदाच मलायका आणि अर्जुन एकत्र स्पॉट झाले आहेत. ते दोघेही मुंबईमधील बस्टियन वर्लीकमध्ये स्पॉट झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, मागील सहा महिन्यांपासून मलायका तिच्या घराबाहेर जास्त गेली नाही आणि या सगळ्यात अर्जुन तिला एकदाही भेटायला गेला नाही.

त्यांच्या अफवानंतर अर्जुन कपूरने इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर करून लिहिले होते की, “अफवांना कुठेही जागा नाहीये. सुरक्षित रहा, खुश रहा, सगळ्यांना शुभेच्छा आणि प्रेम.” अशातच ते दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचे या भेटीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये मलायकाने, काळ्या रंगाचे बुटस आणि डीपनेक पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच अर्जुन आकाशी रंगाच्या स्वेट शर्टमध्ये दिसत होता. (malaika arora and arjun kapoor come together for the first time after breakup rumors)

त्यांचे हे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये त्यांच्यातील बॉन्डींग दिसत आहे. ते दोघे पॅपराजींना पॉझ देताना दिसत आहेत. तसेच ते दोघे एकमेकांशी देखील बोलताना दिसत आहे. त्यांचे हे एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अर्जुन आणि मलायका गेल्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. मलायका अर्जुनपेक्षा वयाने बरीच मोठी आहे. त्यामुळे अनेकवेळा त्यांना ट्रोल देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा