Monday, July 15, 2024

…म्हणून प्रियांका चोप्राने हटवले सोशल मीडियावरून निक जोनासचे आडनाव, केला मोठा खुलासा

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवरील तिच्या पतीचे आडनाव काढून टाकले होते. त्यानंतर तिचा आणि निकचा घटस्फोट होणार आहे तसेच ते दोघे वेगळे होणार आहेत, अशा बातम्या पसरू लागल्या होत्या. अशातच तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

प्रियांकाने (priyanka chopra) नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. तिने सांगितले की, “ही एक कमजोर भावना आहे. जर मी एखादा फोटो शेअर केला तर त्या फोटोच्या मागे जे काही आहे. ते झूम इन केले जाते आणि लोक त्यांचे अंदाज लावायला सुरुवात करतात.” (Priyanka Chopra told why husbund Nick Jonas surname removed from social media handle)

प्रियांकाने हे देखील सांगितले की, “लोक सोशल मीडिया अकाऊंटला आमचे खरे आयुष्य समजतात. परंतु आमचे ते आयुष्य खूप मोठे आणि व्यापक आहे. तसेच लोक गरजेपेक्षा जास्त सोशल मीडियाला महत्व देतात.”

नोव्हेंबर महिन्यात ते वेगळे होणार आहेत या अफवा चालू होत्या. त्यावेळी या अफवांना कुठेतरी पूर्णविराम देण्यासाठी तिने निकचा व्यायाम करताना एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले होते की, “मला तुझ्या मिठीत शेवटचा श्वास घ्यायचा आहे.” यानंतर त्यांच्याबाबत चाललेल्या चर्चा बंद झाल्या होत्या.

प्रियांका आणि निक हे एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २ डिसेंबर २०१८ जोधपूरमध्ये हिंदू आणि इसाई धर्मानुसार लग्न केले. त्यानंतर या जोडीने दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन देखील आयोजित केले होते. दोघांचेही अनेक रोमँटिक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा