Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मलायका अरोराने घातला ‘असा’ ड्रेस; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ हॉटनेस!’

मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे आऊटफिटही नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा मलायकाने तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमात पोहोचली होती आणि तिच्यासोबत करण जोहरही (Karan Johar) दिसला होता. या कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते, पण सर्वांच्या नजरा मलायकाच्या ड्रेसवर खिळल्या होत्या.

चर्चेत असतात सगळेच आऊटफिट
बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा वयाच्या ४८व्या वर्षीही तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मलायकाचा जिम लूक असो किंवा पार्टी लूक, तिची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना भावते. दरम्यान, अभिनेत्रीचा लेटेस्ट व्हिडिओ देखील चर्चेत आला आहे, ज्यामध्ये मलायका सॅटिन ड्रेसमध्ये तिचे आकर्षक फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (malaika arora glamorous photos in peach silk dress gone viral)

व्हायरल होतायत फोटो
मलायका अरोराचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या पोस्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने एका इव्हेंटमध्ये गडद पीच रंगाचा सॅटिन ड्रेस परिधान केला आहे. या डीप नेक बोल्ड ड्रेसमध्ये मलायकाचा जबरदस्त अवतार अक्षरशः आग लावत होता. यामुळेच तिचे फॅशन स्टेटमेंट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

कमाल दिसत होती अभिनेत्री
मलायका अरोराच्या एकंदरीत लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने ड्रेससोबत गोल्डन हाय हिल्स घातल्या होत्या. तर या लूकवर तिने केस कुरळे करून खुले सोडले होते आणि न्यूड मेकअप केला होता. तिच्या या व्हिडिओने समोर येताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, इंस्टाग्रामवर आतापर्यंत याला ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मलायकाच्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणेच या व्हिडिओवरही अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तू खूप हॉट आहेस.” दुसऱ्याने लिहिले, “तुझी स्टाईल मस्त आहे.” त्याचवेळी एक युजर मलायकाला “आय लव्ह यू” म्हणताना दिसला. सोबतच चाहते हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करताना दिसले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा