मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा होय. तिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशननंतर दोन दिवसांनी ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पापाराझींनी शूट केलेला तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मलायकाच्या पायावर झालेल्या जखमेमुळे नेटकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावेळी तिच्या उजव्या पायावर काळ्या रंगाची जखम दिसत होती. मलायका ही जखमेची काळी खूण लपवतानाही दिसली.
मलायकाचा (Malaika Arora) व्हायरल व्हिडिओमध्ये ती एका सलूनबाहेर दिसते. ती शॉर्ट्स आणि टॉप घातलेली आहे. तिच्या उजव्या मांडीवर काळ्या रंगाची जखम दिसत आहे. मलायकाच्या (Malaika Arora Photos) पायावर झालेल्या दुखापतीच्या खुणा पाहून नेटकरी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी तिला कमेंट्समध्ये विचारलं आहे की तिच्या पायाला काय झाले? काही जणांनी तर तिला जखमेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
मलायका सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ (Malaika Arora Videos) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहेत. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. त्यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “अरबाज खाननेच तिला चप्पलने मारले आहे. ” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “‘तू पडली होतीस का?तुझ्या मांडीला काय झालं?” तर अनेकांनी तिला तिची काळजी घायला सांगितली आहे.
View this post on Instagram
मलायका चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. लवकरच मलायका सोनी टीव्हीच्या प्रसिद्ध डान्सिंग रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या नव्या सीझनमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिल्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. (Malaika Arora is seen hiding the wound on her leg the video is going viral)
आधिक वाचा-
–धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ राहत्या घरात आढळला मृतावस्थेत; पोलिसांनी दरवाजा तोडला अन्…
–राजकीय भेटीगाठी वाढल्यामुळे प्राजक्ता माळीवर चाहते नाराज; म्हणाले, ‘तुला अनफॉलो…’