मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांकडून खूप पसंत केली जाते. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दरम्यान, मलायकाने तिच्या आवडत्या जोडीदाराबद्दल खुलासा केला आहे. तिने तिच्या जवळच्या मित्रांपैकी एकाला तिचा सर्वात आवडता व्यक्ती म्हणून वर्णन केले आहे. परंतु हा व्यक्ती अर्जुन कपूर नाही!
शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ
खरंतर, मलायका अरोराने सोमवारी बहीण अमृता अरोराचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान तिने अमृताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्या आणि तिला आपला आवडता जोडीदार म्हटले. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती अमृतासोबत वर्कआउट करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी शांत राहू शकत नाही कारण आज अमृताचा वाढदिवस आहे आणि हा खास दिवस साजरा करण्याचा याहून चांगला मार्ग कोणता आहे.” (malaika arora revealed who is her favourite partner but its not arjun kapoor)
तिने पुढे लिहिले की, “मला नेहमी माझ्या जोडीदारासोबत वर्कआउट करायला आवडते आणि अमृता अरोरा माझी आवडती आहे यात शंका नाही! तुम्हाला कोणासोबत वर्कआउट सेशन करायला आवडते? तुमच्या जोडीदारासोबत (बहीण, भाऊ, मित्र, मुले, पालक आणि प्रशिक्षक) या हालचालींचा सराव करा आणि तुमच्या पोस्ट माझ्यासोबत शेअर करा.”
‘गर्ल गँग’सोबत केलं सेलिब्रेशन
मलायका अरोरा हिने अमृताचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. ज्यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर देखील सामील झाल्या होत्या. या वाढदिवसाच्या पार्टीची झलक करीना कपूरने चाहत्यांसोबत शेअर केली. फोटोमध्ये मलायका, अमृता, करीना आणि करिश्मा कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसल्या. यावेळी सर्वजण काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसल्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :
अर्जुन कपूरला फोनसाठी बोलणे मलायका अरोराला पडले भलतेच महागात, हेटर्सने धरलं धारेवर
‘मला सलमानने नाही बनवले, मी स्वतः…’ जेव्हा मलायका अरोराने चिडून दिले होते स्पष्टीकरण