Friday, April 19, 2024

‘जेलमधल्या कैदीसारखी दिसतेस’, मुलानेच उडवली मलायकाच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सतत आपल्या स्टाइलमुळे आणि वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याने अनेक चाहत्यांना भुरळ पाडते तर अनेकदा तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोलही केले जाते. त्याशिवया सतत तिला तिचा बॉफ्रेंड अर्जुन कपूर याच्यामुळे देखिल ट्रोल केलं जातं मात्र, यावेळेस स्वत: अभिनेत्रीच्या मुलाने तिला कपड्यांमुळे नावं ठेवली आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेस आणि फॅशेनमुळे सतत ओळखली जाते. वयाची 45 वी पार केली आहे तरी मॉडेलिंग असो वा फिगर मेंटेन यमध्ये ती तरुन अभिनेत्रींना मागे सोडते. सध्या अभिनेत्री तिचा नवीन शो ‘मूव्हींग इन विथ मलायका’ (Moving in with Malaika) कार्यक्रमामुळे खूपच चर्चेत असते मात्र, एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीचा मुलगा अरहान खान (Arhan Khan) याने शोमध्ये हजेरी लावली असून मलायकाच्या स्टाइलिश कपड्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

मूव्हींग इन विथ मलायका या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये मलायका तिचा मुलगा म्हणजे अरहान खान याच्या सोबत शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी मलायकाने ग्लॅमरस टॉप परिधान केला होता. मात्र, याच टॉपवरुन अरहानने त्याची आई म्हणजेच मलायकाची मस्करी केली. त्याने आईच्या कपड्यांची तुलाना टेबल नॅपकिनशी केली तो म्हणाला की, “तू जेलमध्ये कैदीसारखी दिसत आहेस.” हे एकूण मलायकाला हसू अनावर होते.

अरहानने मलायकाच नाही तर त्याची मावशी म्हणजेच अमृता अरोरा (Amruta Arora) हिच्यासोबत नात्याबद्दलही माहिती सांगितली की, “मी आमूच्या (अमृता अरोरा) बाजूने आहे. कारण ती (मलायका) तुझी जागा घेण्यासाठी खुप प्रयत्न करत असते. पण माझ्यासाठी ती दुसऱ्या आई सारखीच आहे. मात्र, मला वाटत आहे की, ती आता पहिल्या स्थानावर येते.” त्याच्या वक्तव्यानंतर असे दिसून येत आहे की, अरहानचं मावशी अमृतासोबत खूपच खास नातं आहे. मलायकाच्या चढउतार आयुष्यामध्ये अमृताने मलायकाला खूप साथ दिली आहे.

मलायकाने 2017 साली अरबाज खान (Arbaj Khan) याच्यासोबत घटस्फोट घेतला. या दोघांचा मुलगा रिहान खान 20 वर्षाचा असून अमेरिकामध्ये फिल्म मेकिंगचं शिक्षण घेत आहे. अरबाज आणि मलायका विभक्त झाल्यानंतर दोघेही मुलाल विमानतळावर सोडवण्यासाठी एकत्र पाहिले होते. मुलासोबत दोघेही अनेकदा एकत्र वेळ देताना दिसून येतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अव्यावसायिकतेच्या आरोपांवर गोविंदाने तोडले मौन, म्हणाला- ‘काळानुसार ही फिल्म इंडस्ट्री..’
चिची मामाने कॉमेडियला केलं माफ? गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील भांडण आता संपणार का

हे देखील वाचा