Thursday, March 28, 2024

चिची मामाने कॉमेडियला केलं माफ? गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील भांडण आता संपणार का!

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांचा कौटुंबिक कलह अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आरोप-प्रत्यारोप आणि माफी मागण्याच्या गोष्टी खूप दिवसांपासून सुरू आहेत, पण हे भांडण काय मिटण्याचे नाव घेत नाहीये. मात्र आता या दोघांचे नाते काहीसे सुधारेल असे वाटते. खरं तर, काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक मनीष पॉलच्या (Manish Paul) पॉडकास्ट शोमध्ये सामील झाला होता, जिथे त्याने सांगितले की त्याला हे भांडण सोडवायचे आहे. त्याला वाटते की, त्याच्या चिची मामाने त्याच्या मुलांना खाऊ घालावे. त्याला मामाची खूप आठवण येते. हे सर्व सांगताना कृष्णा खूप भावूकही झाला होता.

आता कृष्णाच्या बोलण्यावर गोविंदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदानेही नुकतेच मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती, जिथे मनीषने त्याला सांगितले की कृष्णाने येऊन माफी मागितली आहे. आता तुम्हाला हवे असल्यास काहीतरी बोला, मी तुम्हाला विनंती करतो. मनीषच्या बोलण्याला उत्तर देताना गोविंदा म्हणतो, “तू आणि आरती… जी माझी सर्वात प्रिय बहीण आहे, तुम्ही तिची मुले आहात. मला तिच्याकडून खूप प्रेम मिळाले. तुम्ही लोक ते सुख उपभोगू शकले नाहीत, याचे मला खूप दुःख आहे. पण मी तसा नाही, माफ करा. कृपया निश्चिंत राहा, तुम्हाला कोणतीही अडचण नाही. देव तुमचे रक्षण करो. भविष्यासाठी सर्व शुभेच्छा.” (govinda accept krushna abhishek apology)

मनीषने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून, त्यावर कृष्णानेही कमेंट केली आहे. कमेंट करताना कृष्णाने लिहिले की, “माझेही त्यांच्यावर प्रेम आहे.”

याआधी मनीषच्या शोचा भाग बनलेल्या कृष्णा अभिषेकने सांगितले होते की, “काय प्रॉब्लेम आहे, मी जेव्हाही काही बोलतो तेव्हा गोष्टी कट-पेस्ट करून दाखवल्या जातात.” हे बोलताना कृष्णा भावूक होतो आणि म्हणतो, “चिची मामा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमची नेहमी आठवण येते. मीडियात काय लिहिलं जातंय, हे पाहण्यासाठी कधी पेपर्सवर जाऊ नका. मला फक्त एकच गोष्ट आठवते. माझ्या मुलांनी माझ्या मामासोबत खेळावे अशी माझी इच्छा आहे.”

हेही वाचा-
ना कश्मिरा शहा, ना सुनीता, पण ‘हे’ आहे कृष्णा अभिषेक आणि गोविंदाच्या भांडण्याचे कारण, वाचा
‘या’ अभिनेत्रीसाठी ठरलेले लग्नही मोडायला तयार होता गोविंदा, वादानंतर बांधली सुनितासोबत लग्नगाठ

हे देखील वाचा