Friday, June 14, 2024

‘या’ कारणामुळे मलायका अन् अर्जुनमध्ये झालीत भांडणं, एकत्र करणार नाही कोणताही सण साजरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी भलेही त्यांच्या नात्याची सार्वजनिक घोषणा केली नाही, परंतु सोशल मीडियावर मात्र ते त्याच्या प्रेमाचा खुलासा करताना नेहमीच दिसत असतात. त्या दोघांची जोडी देखील अनेकांना आवडते. वयात अंतर असले तरी, या गोष्टीचा त्यांच्या प्रेमावर काहीच फरक पडत नाही. त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि मलायकामध्ये भांडण झाले आहे. मलायका अर्जुनवर खूप नाराज आहे.

महाराष्ट्रात चित्रपटगृह खुली झाल्यानंतर आता चित्रपटात काम करण्यासाठी सगळेच उत्साहित आहेत. सगळे कलाकार सध्या त्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशातच अर्जुन कपूरने मोहित सुरी यांच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. (Malaika Arora upset with boyfriend arjun kapoor because of his busy schedule and shoots)

अर्जुन अजूनही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. यानंतर देखील तो क्रिसमस तसेच नवीन वर्षापर्यंत त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. दिवाळीमध्ये अर्जुन आणि मलायकाने खूप एन्जॉय केले आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता देखील क्रिसमस मलायकाला अर्जुनसोबत साजरी करायची आहे. परंतु त्यावेळी अर्जुन कामात व्यस्त असल्याने तो भेटण्यासाठी नकार देत आहे. माध्यमातील वृत्तानुसार अर्जुनने भेटण्यास नकार दिल्याने मलायका त्याच्यावर नाराज आहे.

मलायका आणि अरबाजने १९९८ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या संसारात अनेक चढ-उतार आले. त्यामुळे लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनबाबत अनेक बातम्या येऊ लागल्या होत्या. अर्जुन हा मलायकापेक्षा वयाने खूप लहान असल्याने त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते.

अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो या आधी शेवटचा ‘भूत पोलीस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. तसेच मलायकाने अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा