Monday, March 4, 2024

ब्रेकिंग! 700 हून अधिक सिनेमात काम केलेला अभिनेता आणि माजी खासदार काळाच्या पडद्याआड

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेते आणि पूर्व लोकसभा संसद असलेले इनोसेंट यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. कोची येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू अनेक कारणांमुळे झाला आहे. ते कोरोनाने संक्रमित होते, त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत होता यासोबतच त्यांच्या शरीरातील काही अवयवांनी काम करणे देखील बंद केले होते. यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

मागील काही काळापासून इनोसेंट यांची तब्येत ठीक नव्हती. आधी ते कॅन्सरने ग्रस्त होते. मात्र त्यांनी कॅन्सरला लढा दिला आणि ते पूर्णपणे बरे झाले. पुढे त्यांना श्वास घ्यायला समस्या जाणवू लागली त्यानंतर त्यांना ३ मार्च २०२३ रोजी एका रुग्णालयात भरती केले गेले. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांनी कोचीच्या वीपीएस रुग्णालयात २६ मार्च रोजी रात्री १०.३० रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी एलिस आणि मुलगा सॉनेट आहे.

काही वर्षांपूर्वी इनोसेंट कॅन्सरने ग्रस्त होते मात्र २०१५ साली त्यांनी ते कॅन्सरमुखत झाल्याचे जाहीर केले होते. त्यांनी कॅन्सर विरोधात अतिशय अवघड लढाई लढली आणि यात ते यशस्वी देखील झाले होते. इनोसेंट यांनी लढलेल्या कॅन्सरविरोधातील लढाईबद्दल ‘लाफ्टर इन द कॅन्सर वार्ड’ त्यांच्या पुस्तकात मोठी माहिती दिली आहे.

इनोसेंट यांना अखेरचे पृथ्वीराज सुकुमारन यांच्या २०२२ साली आलेल्या ‘कडुवा’मध्ये पाहण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या पाच दशकांपेक्षा मोठ्या करियरमध्ये जवळपास ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १२ वर्षांपर्यंत ते असोसिएशन ऑफ मल्याळम मूवी आर्टिस्टचे अध्यक्ष देखील होते. मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांना कॉमेडी अभिनेता म्हणूनच मोठी ओळख मिळाली. यासोबतच त्यांनी खलनायकी भूमिका देखील उत्तम रंगवली. शिवाय एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट म्हणून देखील ओळख मिळवली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र
‘ये काली काली आँखें…’ दीपिकाचा लेटेस्ट फाेटाेशूट पाहिलात का?

हे देखील वाचा