Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड ‘बर्थडे गर्ल’ मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज पाहून, चाहत्यांना झाली ‘मर्डर’ चित्रपटाची आठवण

‘बर्थडे गर्ल’ मल्लिका शेरावतचा बोल्ड अंदाज पाहून, चाहत्यांना झाली ‘मर्डर’ चित्रपटाची आठवण

मल्लिका शेरावत बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिची जबरदस्त स्टाईल कोणालाही वेड लावू शकते. चित्रपटसृष्टीत ती फारशी सक्रिय नसली, तरी सोशल मीडियावर तिची उपस्थिती कायम आहे. मल्लिका शेरावत दररोज तिचे सुंदर आणि हॉट फोटो शेअर करत असते. आता अभिनेत्रीचे असे अनेक फोटो समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

मल्लिकाने दाखवला बोल्ड अवतार
मल्लिकाने रविवारी (२४ ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर खूप सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने पूलाच्या कडेला ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत. मल्लिकाने पिवळ्या रंगाच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बर्थडे दर्ल फिट एंड फॅब्युलस.”

चाहते झाले फिदा
मल्लिकाच्या या फोटोवर भरपूर कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. एका फोटोमध्ये ती पूलाच्या बाजूला झोपलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती खांबाला टेकून उभी असल्याचे दिसत आहे. चाहते तिच्या या लूकची तुलना ‘मर्डर’च्या लूकशी करत आहेत. बरेच चाहते असे म्हणत आहेत की, हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तिचा ‘मर्डर’ अंदाज आठवत आहे.

मल्लिका करणार आहे पुन्हा कमबॅक
मल्लिका शेरावतने २००३ मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘मर्डर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये इमरान हाश्मीसोबत तिच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना मल्लिका शेरावत म्हणाली की, ‘मर्डर’ चित्रपटानंतर तिला चांगले काम मिळणे बंद झाले होते. मल्लिकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही काम केले आहे. आता मल्लिका पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच तिचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच ती एका रियॅलिटी शोच्या सेटवरही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटात १७ किसींग सीन देऊन आली होती चर्चेत, खूप कठीण होता मल्लिका शेरावतचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

-जेव्हा पितृसत्तेचा विरोध करत मल्लिकाने झापले वडिलांना; म्हणाली होती, ‘तू मला जन्म दिलास म्हणून…’

हे देखील वाचा