Wednesday, February 21, 2024

रियल बधाई हो! ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री २३ व्या वर्षी झाली ताई, आईने दिला वयाच्या ४७ व्या वर्षी बाळाला जन्म

सगळ्यांनाच आयुष्मान खुराणाचा ‘बधाई हो’ हा सिनेमा आठवत असेलच. या चित्रपटात आयुष्यमानच्या आईची भूमिका साकारलेल्या नीना गुप्ता वयाच्या ४५ व्या वर्षी मुलीला जन्म देतात. दोन मोठे मुलं झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा आई होणार असल्याचे समजल्यावर घरच्यांची, बाहेरच्यांची नक्की काय प्रतिक्रिया असणार, ते कसे ही बाब हाताळणार यावर हा सिनेमा आधारित होता. मात्र आता अशीच एकदम सारखी घटना एका अभिनेत्रींच्या आयुष्यात झाली आहे. तिच्या आईने वयाच्या ४७ व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणाऱ्या आर्या पार्वत या अभिनेत्रीच्या आईने वयाच्या ४७ व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे. यामुळे २३ वर्षीय अभिनेत्री आर्या पार्वती हिच्या आनंदाला पारावार उरला नाही. वयाच्या २३ व्या वर्षी एका लहान मुलीची बहीण झाल्यामुळे एकीकडे पार्वती आनंदात आहे, तर दुसरीकडे तिचे फॅन्स आणि लोकं आश्चर्य व्यक्त करत आहे.

अभिनेत्री आर्य पार्वतीने नुकतीच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. यावेळी तिने तिचा आनंद व्यक्त केला. पार्वतीने हे देखील सांगितले की, जेव्हा वयाच्या ४७ व्या वर्षी तिला तिच्या आईच्या प्रेग्नन्सीबद्दल समजले तेव्हा तिला धक्काच बसला होता. तिला समजतच नव्हते की कसे रिऍक्ट करावे. ही अशी बाब अजिबातच नव्हती जिची तुम्ही अपेक्षा करता. कारण तुम्हाला माहीतच नसते की, वयाच्या २३ व्या वर्षी तुमचे आईवडील तुम्हाला असे काही सांगितली.

आर्या पार्वती म्हणाली की, “मला लहानपणापासूनच एका बहिणीची खूपच हौस होती. मला जेव्हा माझ्या वडिलांनी याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले की, मी या गोष्टीला गुप्त ठेवले होते, कारण आम्हाला माहित नाही तू कसे रिऍक्ट करशील. काही दिवसांनी मी घरी गेले तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेऊन रडली. मी तिला म्हणाली, मला का लाज वाटेल? मला तर हे कधीचे पाहिजे होते.”

पुढे आर्या पार्वतीने हे देखील सांगितले की, तिच्या आईला तिच्या जन्मानंतर काही समस्या आल्याने त्या पुन्हा आई होऊ शकणार नसल्यचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र एकदा आई आणि बाबा एक दिवस मंदिरात गेले असताना आईला अचानक चक्कर आली. तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर ती गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सात महिन्याची गरोदर असूनही आईचं बेबी बंप दिसत नव्हते. माझ्या आईला काही महिने मासिक पाळी आली नव्हती. परंतु, वाढत्या वयामुळे असे झाले असल्याचे आईला वाटले. त्यामुळे तिने याकडे दुर्लक्ष केले.” मात्र आता त्यांचे कुटुंब पूर्ण झाले असून ती खूप आनंदात असल्याचे तिने सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

हे देखील वाचा