Thursday, November 30, 2023

दु:खद! ‘अवतार 2’ पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा धक्कादायक मृत्यू, चित्रपटगृहातच घेतला अखेरचा श्वास

सिनेमागृहामध्ये सध्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर 2’ या हॉलिवूड चित्रपटाने आपली जागा निर्माण केली आहे. तब्बल 12 वर्षानंतर अवतार चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलच प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येकचजन हा चित्रपट पाहाण्यासाठी निनेमागृहामध्ये धाव घेत असून अवतार चांलीच धमाल करत आहे. मात्र, नुकतंच ‘अवतार 2’ बद्दल एक दु:खद घटना समोर आली आहे.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avtar: The Way Of Water) चित्रपटाला एकीकडे भरभरुन प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करत आहे, मात्र, दुसरीकडे चित्रपटाशी निगडीत एक दु:खद घटना समोर येत आहे. अवतार चित्रपट पाहत असताना चित्रपटगृहामध्ये एका प्रेक्षकाचं निधन झालं आहे. माध्यमातील वृत्तानुसार आंध्रप्रदेशमधील पेड्डापुरम शहरातील चित्रपटगृहामध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांनी चित्रपट पाहात असतानाच अखेरचा श्वास घेतला.

चित्रपटगृहामध्ये ‘अवतार 2’ पाहात असताना अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते जागेवरच कोसळले आणि त्यांनी चित्रपटगृहामध्येच शेवचटा श्वास घेतला. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ राजू देखिल होता. श्रीनू यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर लगेचच राजू यांनी रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलं.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्रीनूचं निधन झालं. श्रीनू शिवाय त्याच्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि मुलगी आहे.  अशा श्रीनूच्या अशा मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा दक्का बसला आहे. अशीच घटना 2010 साली देखिल घडली होती. अवतार चित्रपटाचा भाग एक पाहायला आलेल्या 42 वर्षीय व्यक्तीचं निधन झालं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेमात फसवणूक! डिप्रेशनमधून बाहेर आलेल्या अंजलीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘शहरात एकटी…’

लुटावं तरी किती? एक-दाेन हजार नव्हे, तर हिनाने बुटासाठी ‘एवढी’ माेठी मागितली रक्कम

हे देखील वाचा