टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर यांची त्यांच्या मुलाने हत्या केल्याची धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. प्रॉपर्टीसाठी अभिनेत्रीच्या मुलाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता ‘मृत’ अभिनेत्री वीणा कपूर यांनी मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपण जिवंत असल्याचा दावा केला आहे.
खरं तर झालं असं की, टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर (veena kapur) यांची हत्या झाली नसून मुंबईच्या जुहू भागात रहिवासी असलेल्या वीणा कपूर यांची हत्या झाली आहे. मृत महिलेची हत्या त्यांचा मुलगा सचिन कपूरने केली आहे. दाेघींच्या एकाच नावामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ते अभिनेत्री वीणा कपूरला मृत समजू लागले. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्यांच्या मुलालाही ट्रोल करण्यात आले. आता अभिनेत्री वीणा कपूरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी लोकांविरोधात तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आपण जिवंत असल्याची तक्रार अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिसांकडे केली असून त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहताना लोक त्यांच्या मुलाचा अपमान करत आहेत, त्यामुळे त्या दुखावल्या आहे, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.
अभिनेत्री वीणा कपूरने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी अस्वस्थ आहे. माझे फोटो व्हायरल झाले आणि लोक मला श्रद्धांजली वाहत आहेत. मला लोकांचे फोन येत आहेत आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये. मला सर्वांना सांगायचे आहे की, “माझ्या मुलाने मला मारले नाही. माझ्या मृत्यूची चुकीची बातमी पसरवली गेली. या खोट्या अफवेमुळे मला काम मिळणेही बंद झाले आहे. ज्या महिलेची हत्या करण्यात आली तिचे नाव वीणा कपूर आहे, हे लक्षात घ्यावे.”
विणा कपूर यांच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. (actress veena kapur is not dead reaches police station and files complaint against her murder rumour)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ पाहिल्यानंतर अक्षय कुमारने शेअर केली पोस्ट, कौतुक करत सांगितली ‘ही’ गोष्ट
‘पठाण’साठी दीपिकाने 15, तर जॉनने घेतले 20 कोटी, शाहरुखच्या मानधनाचा आकडा सरकवेल पायाखालची जमीन