‘मन उडू उडू झालं’ मालिकेचे १०० एपिसोड पूर्ण, सेटवर झाले सुंदर सेलिब्रेशन


झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं‘ मालिका अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत सगळ्यांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेता अजिंक्य राऊत देखील या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच या मालिकेचे १०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. यानिमित्त मालिकेच्या सेटवर दणक्यात सेलिब्रेशन झाले आहे. त्याचा एक व्हिडिओ अजिंक्य राऊतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

अजिंक्यने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेची संपूर्ण टीम दिसत आहे. यावेळी ऋता आणि अजिंक्य केक कापताना दिसत आहे. मालिकेचे १०० एपिसोड यशस्वी पूर्ण झाल्याने त्यांनी हे छोटेसे सेलिब्रेशन केले आहे. या व्हिडिओच्या बँकग्राऊंडला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेचे शीर्षक गीत लागले आहे. तसेच मालिकेची संपूर्ण टीम खूप खुश दिसत आहे.   (man udu udu zal serial complete 100 episodes)

या मालिकेचे शीर्षक गीत आर्या आंबेकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. त्यांचे हे शीर्षक गीत देखील प्रेक्षकांना खुप आवडत आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेत ऋताला प्रेक्षकांनी एका कॉलेज कुमारीच्या रूपात पाहिले आहे. तिचे ते अल्लड आणि बिनधास्त स्वभाव पाहिला आहे. परंतु या मालिकेत अत्यंत साधी आणि सोज्वळ दिपूचे पात्र तिने साकारले आहे. तिच्या या पात्राला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.

ऋताची ‘फुलपाखरू’ ही मालिका संपून दोन वर्ष उलटले होते. त्यानंतर ती जास्त कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्यामुळे तिचे हे टेलिव्हिजनवरील पुनरागमन तिच्या चाहत्यांना दिलासा देणारं होतं. तिचे मालिकेतील पात्र कसे असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. परंतु मालिकेतील तिचे समंजस आणि मेहनती पात्र बघून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. तिने ‘दुर्वा’ या मालिकेत देखील काम केले आहे. तसेच तिचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग देखील चालू आहे. या नाटकात उमेश कामात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा :

सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंगची ‘८३’ प्रिमिअरवेळी ग्रेट भेट, दोन मित्रांमधील प्रेम सोशल मीडियावर व्हायरल

प्रभास आणि पूजा हेगडे अभिनित ‘राधे श्याम’ सिनेमाच्या ट्रेलरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, सस्पेन्स कायम

अरविंद कल्लू ‘प्यार के देवता’मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 

 


Latest Post

error: Content is protected !!