अरविंद कल्लू ‘प्यार के देवता’मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


भोजपुरी सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू याची एकीकडे युट्यूबवर गाणी धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे तो सध्या त्याच्या आगामी चित्रपटातही व्यस्त आहे. अलीकडेच, त्याने त्याच्या आगामी ‘प्यार के देवता’ चित्रपटाबद्दल सांगितले की, ही कथा सामाजिक नियम आणि संस्कारांची आहे, जी प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासह पाहता येईल. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अरविंद (Arvind Akela Kallu) म्हणाला की, आम्ही चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टपासून ते डायलॉग आणि गाण्यांपर्यंत सर्व काही तुम्हाला खूप आवडणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप छान होती, ज्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आपण सर्वजण उत्सुक आहोत. मला आशा आहे की, आमचे प्रेक्षक आम्हाला नक्कीच प्रेम आणि आपुलकी देतील.

‘प्यार के देवता’चे संपूर्ण शूटिंग लखनऊमध्ये झाले असून, साई शृंगारच्या बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री यामिनी सिंग अरविंदसोबत दिसणार आहे. याशिवाय समर्थ चतुर्वेदी, देव सिंग, कृष्ण कुमार, नूर अहमद तुबा, परशुराम आणि पारुल कांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माता संजय कुमार सिंग आहेत आणि दिग्दर्शक एम. फैसल रियाझ आहेत. ज्यांनी रवी किशन आणि मोनालिसासोबत ‘रक्तभूमी’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. त्याची पटकथा राय यांनी लिहिली असून संगीत ओम झा यांचे आहे.

याआधी अरविंदने आगामी ‘विजेता’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला होता. ज्यामध्ये तो अनेक स्टाईलमध्ये दिसला होता. ‘विजेता’मध्ये कल्लू को-स्टार यामिनी सिंगसोबत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर ऍक्शन, रोमान्स, इमोशन आणि ड्रामाने परिपूर्ण आहे.

व्हिडिओ पाहून ‘विजेता’ची कथा आणि त्याचे चित्रीकरण अतिशय दर्जेदार दिसते आणि त्याची कथा स्पोर्ट्स ड्रामा (स्पोर्ट बेस्ड भोजपुरी चित्रपट)वर आधारित आहे. ट्रेलरनंतर, १३ डिसेंबर, २०२१ रोजी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीवर विजेत्याचा सर्वात रोमँटिक ट्रॅक देखील प्रदर्शित झाला. ‘कारी कारी अंखियां’ (Kari Kari Ankhiyan) असे या गाण्याचे बोल असून, ते गावातील हिरवळीत चित्रीत करण्यात आले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!