Friday, May 24, 2024

मालिका संपतेय म्हणून कलाकारांनी केल सेलिब्रेशन, काय आहे प्रकरण?

मराठी छोट्या पडद्यावर अनेक मालिका सध्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामधीलच ‘मन उडू उडू झाल’ ही लोकप्रिय मालिका सध्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग नुकतेच पुर्ण झाले. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची लवस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता ही मालिका लवकरच बंद होणार आहे. परंतु मालिकेचे कलाकार मात्र चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झाल’ मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच मालिकेतील प्रत्येक कलाकाराला घराघरात लोकप्रियता आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. परंतु आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच मालिकेच्या कथेत दिपा आणि इंद्राच्या लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळाला. या गोड शेवटानंंतर आता मालिका कायमचीच बंद होणार आहे. असे असले तरी मालिकेतील कलाकार मात्र चांगलेच धमाल उडवताना दिसत आहेत.

मन उडू उडू झाल मालिकेतील साळगावकर कुटूंब चांगलच लोकप्रिय झाल होत. याच साळगावकर कुटूंबाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा धमाल व्हिडिओ अभिनेत्री प्राजक्ता परबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ इंद्रा आणि दिपूच्या लग्नामधील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये साळगावकर फॅमिली डान्स करताना दिसत आहे. यामध्ये इंद्रा, दिपू, कार्तिक, मुक्ता त्यांची आई तसेच सानिका आणि सत्तू ही मालिकेतील कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे.

 

 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मालिकेचा टीआरपी कमी असल्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु मालिकेतील कलाकार ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ही मालिका बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा –

संभावना सेठला गाठलंय ‘या’ भयंकर आजाराने, सांगताना ढसाढसा रडली अभिनेत्री

रणवीर सिंगविरुद्धच्या एफआयआरवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘आपल्या देशात मूर्खपणा…’

अरेरे! राखी सावंतला बॉयफ्रेंडने भर रस्त्यातच केली मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा