Friday, May 24, 2024

रणवीर सिंगविरुद्धच्या एफआयआरवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘आपल्या देशात मूर्खपणा…’

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्याला केवळ सोशल मीडियावर ट्रोल केले जात नाही, तर रस्त्यावरही या अभिनेत्याचा निषेध होत आहे. रणवीर विरोधात मुंबईतील चेंबूर आणि ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्याला सपोर्ट करणारे सेलेब्स देखील आहेत. दरम्यान, रणवीरच्या न्यूड फोटोंवरून झालेल्या गदारोळावर स्वरा भास्करनेही (Swara Bhasker) प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने अभिनेत्याविरुद्धच्या एफआयआरवर प्रतिक्रिया देत याला मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.

स्वराने एक ट्वीट रिट्वीट केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याविरोधात एफआयआर बद्दल लिहिण्यात आले आहे. हे ट्विट रिट्विट करताना अभिनेत्रीने लिहिले की, “अविश्वसनीय… सध्या आपल्या देशात मूर्खपणा आणि बेरोजगारी वाढतच आहे.” (swara bhasker react on fir against ranveer singh)

रणवीरवर अश्‍लीलता पसरवणे आणि इतर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील वेदिका चौबे म्हणाल्या, “मी स्वतः माझे पती अभिषेक चौबे यांच्या एनजीओसोबत या प्रकरणी सोमवारी चेंबूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याची दखल घेत एनजीओच्या याचिकेवर एफआयआर नोंदवला आहे. “सिंग यांच्या फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला, असे त्यांनी संगीतले.

चौबे दाम्पत्याच्या लेखी तक्रारीनंतर, चेंबूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २९२ (अश्लील पुस्तकांची विक्री इ.), २९३ (तरुणांना अश्लील साहित्य विक्री), ५०९ (महिलांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याच्या उद्देशाने शब्द बोलणे) ठोठावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा