Wednesday, October 15, 2025
Home मराठी ‘या जगात तो माझे जग आहे,’ म्हणत मानसी नाईकने लग्नाच्या वाढदिवसा आधीच पतीला दिले खास गिफ्ट

‘या जगात तो माझे जग आहे,’ म्हणत मानसी नाईकने लग्नाच्या वाढदिवसा आधीच पतीला दिले खास गिफ्ट

अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मागच्याच वर्षी मानसी लग्नबंधनात अडकली आहे. त्यानंतर ती चित्रपट सृष्टी पासून जरा दूर झाली आहे. परंतु ती सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करून चाहत्यांशी जोडून असते. येत्या १९ जानेवारीला तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. यानिमित्त आधीच तिने आणि तिच्या पतीने टॅटू काढले आहेत.

मानसीने (manasi naik) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने आणि तिच्या पतीने बोटावर क्वीन आणि किंगच्या क्राऊनचा टॅटू काढला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातावरील टॅटू काढताना दिसत आहे. (manasi naik give special gift to her husbund before wedding anniversary)

हा व्हिडिओ शेअर तिने लिहिले आहे की, “लग्नाचा पहिला वाढदिवस १९ जानेवारी रोजी आहे. आम्हाला एकमेकांना काहीतरी सुंदर वचन द्यायचे होते. म्हणून आम्ही एकमेकांना वचन दिले की आम्ही एकत्र एक साम्राज्य निर्माण करू. या जगात तो माझे जग आहे. राजा आणि राणी. आमचा पहिला कपल टॅटू.”

त्यांचा हा टॅटू सगळ्यांना खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना त्यांची जोडी खूप आवडते. सोशल मीडियावर या जोडीचे प्रेम आपल्याला दिसते. मानसी नाईकने मागच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

हेही वाचा :

हे देखील वाचा