Thursday, March 19, 2026
Home मराठी वर्षभरातच बिघडले मानसी नाईकचे पतीसोबत नाते? व्हिडिओ शेअर करून म्हणते, ‘इतके चांगले वागू नये’

वर्षभरातच बिघडले मानसी नाईकचे पतीसोबत नाते? व्हिडिओ शेअर करून म्हणते, ‘इतके चांगले वागू नये’

अभिनेत्री मानसी नाईक हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. अभिनयासोबत तिने डान्सची कला देखील जोपासली आहे. तिच्या डान्सची झलक आपण सर्वांनी पाहिलीच आहे. तिने मराठीमध्ये अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. मानसी आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ तसेच फोटो देखील ती वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच मानसीने तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मानसी जुन्या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. व्हिडिओत ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मानसीने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
कारण
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात….. माणसं !
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात….. माणसं !
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात….. माणसं !
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात….. माणसं !
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात …… माणसं !”

तिने शेअर केलेला हा व्हिडिओ आणि कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा