क्रिकेट टूर्नामेंटमध्ये प्रि-मॅच आयोजित करताना अनेक क्रिकेटपटू माझ्याकडे टक लावून पाहतात असं भाष्य मंदिरा बेदीने केला आहे. तिने याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला आहे. मंदिरा सांगते (mandira bedi) की, “माझे प्रश्न त्यांना बालिश वाटायचे, मी कोणते प्रश्न विचारतेय याचा विचार करायची आणि अनेकदा माझ्या प्रश्नाची उत्तरही ते देत नसत. त्यांनी उत्तर दिले तरी माझ्या प्रश्नशी काहीही संबंध नसायचा आणि मला त्याची भिती वाटायची. उल्लेखनीय म्हणजे ती अशा महिलांपैकी एक आहे ज्यांनी किक्रेट स्पर्धांचे समालोचन केले आहे.” त्यानी २००३ आणि २००४ मध्ये आईसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २००४ व २००६ चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन केले होते. इंडियन प्रीमियर लीग सीजन २ च्या दरम्यान तिने सोनी मॅक्ससाठी शो होस्ट केला होता. त्याचवेळी ती आईटीवीसाठी (एक ब्रिटिश नेटवर्क) ‘आईपीएल ३’चे नेतृत्व केले आहे.
तिने महिलांवर क्रिकेट विश्वात होणाऱ्या अन्याय विरोध खुलासा केला आहे ती म्हणते की, “पॅनलवर बसलेल्या लोकांना मी किक्रेट शो होस्ट करावा असं वाटले नाही. माझे खूप मित्र होते पण आता ते निवृत्त झाले आहेत पण नंतर पॅनला माझी मैत्रीही आवडली नाही. कोणतीही महिला साडी नेसून राजेशाही पद्धतीने क्रिकेटबद्दल बोलणे त्यांना हे आवडत नव्हतं. कोणीही मला मार्गदर्शन केले नाही, ना कोणी मला प्रश्न सांगितले, मी तिथे सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. ज्यांना किक्रेटच्या तांत्रिक गोष्टी माहित नाहीत ज्यांना क्रिकेटचे बारकावे माहित नाहीत.”
ती पुढे म्हणते की, “मला सांगण्यात आले होते की, त्या विशिष्ठ वेळी तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न येतात तेच तुम्हाला विचारायचे आहे. मला ते स्वातंत्र्य देण्यात आले होते. अर्थातच अनेक क्रिकेटपटूंनी माझ्या प्रश्नाकडे टक लावून बघितले आणि हसले आणि मला वाटले की, का विचारले असतील असे प्रश्न मी. त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. हे खूप भितीदायक वाटेल चॅनेलने मला आदेश दिला होता. फक्त सोनीच होते ज्यांनी मला समर्थन केले. आणि १५० ते २०० महिलातून मला निवडून दिले.
पुढे ती म्हणाली की, “मला म्हटले की, आम्ही तुम्हाला काही कारणावस्तव निवडले आहे. आम्हाला वाटते की, आम्हाला आवश्यक असलेली गुणवत्ता ती तुमच्याकडे आहे. म्हणून पुढे जा आणि तुम्ही जसे आहात तसे राहा आणि या वेळेचा आनंद घ्या. तिने ‘शांति’ (1994) टेलीविजन मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर ‘औरत’, ‘हॅलो फ्रेंड्स’, ‘दुश्मन’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ और ‘महाभारत’ यासांरख्या अनेक टेलीविजन मालिकेमध्ये तिने काम केले आहे.