Monday, July 1, 2024

दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक असलेल्या मंदिरा बेदीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंदिराचे पती राज कौशल यांचे आज (३० जून) सकाळी निधन झाले. त्यांच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, राज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

राज यांनी एक अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘ऍंन्थनी कौन है’ असे तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मंदिराच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी राज कौशलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांची पहिली भेट १९६६ मध्ये मुकुल आनंदच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी पोहोचली होती आणि राज मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. इथूनच या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. मंदिरा बेदीने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी राज कौशलशी लग्न केले होते. (mandira bedi s husband raj kaushal passed away this morning family sources suggest he died of a heart attack)

प्रेमात बुडालेल्या या जोडप्याने लग्न केले तर खरे, पण त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे नाते मान्य नव्हते. खरंतर मंदिराच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिचे लग्न एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी करावे. पण या जोडप्याच्या प्रेमाच्या आड कोणीही येऊ शकले नाही. या जोडप्याला २०११ मध्ये मुलगा झाला, तर गेल्याच वर्षी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा