Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट, पतीसोबतचे फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट, पतीसोबतचे फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे म्हणजेच प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राज कौशल यांचे बुधवारी (३० जून) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी राज कौशल यांच्या स्मरणार्थ एका प्रार्थना सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेला इंडस्ट्रीमधील अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली होती.

राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिराने तिचा इंस्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो काढून टाकला आणि त्याऐवजी तिच्या इंस्टाग्राम डीपीला ब्लॅक मार्क केले. त्यानंतर तिच्या डीपीच्या फोटोच्या जागी आता तिथे काळ्या रंगाशिवाय काहीच दिसत नाही. मात्र, मंदिराने पतीच्या निधनानंतर सोशल मीडियावर पहिलीच पोस्ट शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे पती राजसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोमध्ये मंदिरा राजसोबत अतिशय आनंदी आणि काहीतरी सेलिब्रेट करताना दिसत आहे. पण आता राजच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीमध्ये मंदिराने हे फोटो शेअर करत एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी वापरला आहे. यावरूनच अंदाज येतो की, राज यांच्या मृत्यूमुळे मंदिरा किती कोलमडून पडली आहे. कोणत्याही शब्दांचा वापर न करता तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टला शक्ति मोहन, सायना नेहवाल, मिथिला पालकर, अदा शर्मा आदी कलाकारांनी उत्तर देत तिला धीर दिला आहे, तर फॅन्सने देखील मंदिराला मजबूत राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी तिच्या कपड्यांमुळे आणि अनेक वर्षाच्या परंपरा मोडत मंदिरा बेदी पतीच्या अंतिम संस्काराच्या विधी पार पडल्यामुळे ट्रोल झाली होती. यावरून सोशल मीडियावर अनेक युजर्सने तिचे कौतुक केले, तर काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यात मंदिरा बेदीची बाजू घेत गायिका सोना मोहपात्रा ट्रोलर्सवर चांगलीच भडकली होती.

लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून नावारूपाला आलेल्या राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ ‘अँथनी कौन हैं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. सुरुवातीच्या काळात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राज यांनी १९९८ साली स्वत:ची जाहिरात कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ८०० जाहिरातींचे दिग्दर्शन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा