टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेली मंदिरा बेदी मागच्या काही दिवसांपासून सतत प्रकाशझोतात आहे. अनेक कठीण दिवसांना धीराने तोंड देणारी मंदिरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंदिराच्या पतीच्या राज कौशल यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली होती. मात्र ती तिच्या दोन्ही मुलांसाठी मनावर दगड ठेऊन मजबुतीने उभी राहिली. मंदिराने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्या पोस्टमध्ये तिने नवीन सुरुवात असे लिहिले आहे.
मंदिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून, यात तिने तिचा साधी साडी आणि गळ्यात आकर्षक नेकलेस घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, “ज्यांना आवश्यकता आहे त्यांना भरपूर प्रेम आणि सकारात्मकता पाठवत आहे.” यासोबतच तिने #beginagain #nirbhaunirvair असे हॅशटॅग देखील वापरले आहे. मंदिराचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून, यावर फॅन्स आणि कलाकार कमेंट्स करत तिला तिच्या नवीन सुरुवातीसाठी आणि तिच्या या पावलासाठी शुभेच्छा देत आहेत. शिवाय तिला धीर ठेवायला देखील सांगत आहे. यासोबतच तिने अनेकांना प्रेरित केल्यामुळे काही चाहते तिचे आभार देखील व्यक्त करत आहे. आता मंदिरा लवकरच कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
नुकताच मंदिराने तिच्या मुलीचा २८ जुलैला वाढदिवस साजरा केला. याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मुलांसाठी धैर्याने उभी राहणाऱ्या मंदिराचे सर्वच लोक भरभरून कौतुक करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी मंदिरा पतीच्या निधनानंतर सोशल मीडियापासून लांब गेली होती. मात्र आता पुन्हा ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. काही दिवसांपासून ती स्वतःला आणि इतरांना प्रेरित करणारे अनेक संदेश आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे.
तत्पूर्वी मंदिराचे पती आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचे ३० जून २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिरा कोलमडून पडली होती. मात्र आता मंदिरा हळूहळू यातून सावरत आहे. तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’