Monday, July 1, 2024

संघर्षाच्या काळात घरात करायचा कामवाल्या बाईचे काम; तर आज आहे मनोरंजनविश्वातील लोकप्रिय सूत्रसंचालक

पूर्वी बॉलिवूड किंवा ग्लॅमर जग म्हटले की डोळ्यासमोर यायचे ते फक्त अभिनय. मात्र काळ बदलला आणि तसे हे ग्लॅमर जग अधिक व्यापक होत गेले. या जगात अनेक विभाग तयार झाले. मनोरंजन क्षेत्रात राहून सिनेमांपेक्षा काहीतरी वेगळे करायची अनेकांची इच्छा असते. मात्र असे कोणते काम आहे, जे या क्षेत्रात राहून आपल्याला करता येईल. अशी कामं बरीच आहेत, फक्त आपल्याला ते क्षेत्र आणि त्यातील संधी ओळखता आली पाहिजे आणि नक्कीच त्या क्षेत्रात कामं करण्यासाठी आपल्यात प्रतिभा देखील पाहिजेच. पूर्वी सूत्रसंचालन करणे म्हणजे खूप काही मोठे काम नव्हते, पुरस्करांचे सूत्रसंचालन तर कलाकारच करायचे. ते तर आताही होते. पण आता हे काम करण्यासाठी काही मंडळी उपलब्ध आहेत, त्यामुळे कलाकार फार कमी दिसतात. असाच एक हुशार, प्रतिभावान सूत्रसंचालक, अभिनेता म्हणजे मनीष पॉल. मनीष हा सध्याच्या घडीला इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक आहे. आज मनीष त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

मनीषचा जन्म ३ ऑगस्ट १९८१ रोजी दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण अपीजय स्कुल दिल्ली इथून पूर्ण केले. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने पर्यटन विषयात दिल्ली विद्यापिठातून पदवी संपादन केली. पुढे तो मुंबईमध्ये त्याच्या आजीकडे आला. (know untold story of maniesh paul struggling days)

शाळेत असताना मनीष अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करायचा. कधी कधी शाळेच्या कोणत्या कार्यक्रमात काहीही अडचण आली, त्याला स्टेज सांभाळायला दिले जायचे. मग आलेली अडचण सोडवली जाते, तोपर्यंत मनीष सर्वांचे पूर्ण मनोरंजन करायचा. तेव्हा त्याने विचारही केला नसेल, की त्याच्यातला हाच गुण त्याला मोठे नाव मिळवून देईल.

मनीषला अभिनय करायचा होता. म्हणून तो खूप मेहनत घेऊन कामाच्या शोधात असायचा. त्याला अभिनयात नाही तर रेडिओमध्ये आर.जे. चे काम मिळाले. रेडिओ सिटीमध्ये ‘कसकाय मुंबई’ हा शो तो करायचा. यानंतर त्याला पहिली सूत्रसंचालनाची संधी मिळाली, ती स्टार प्लसच्या ‘संडे टॅंगो’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने. यानंतर त्याने ‘छूना है आसमान’, ‘घोस्ट’, ‘राधा की बेटीया कुछ कर दिखायगी’, ‘घर घर मैं’ आदी अनेक मालिकांमध्ये काम केले.

मालिकांसोबतच मनीषने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यात ‘तीस मार खान’, ‘ए.बी.सी.डी’, ‘मिकी व्हायरस’, ‘तेरे बिन लादेन २’ आदी सिनेमांचा समावेश आहे. ‘मिकी व्हायरस’ सिनेमाच्या निमित्ताने तो पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. त्याच्या या सिनेमाचे खूप कौतुक देखील झाले.

मनीषने सिनेमे, मालिका खूप केल्या, मात्र त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी ही सूत्रसंचालक म्हणूनच मिळाली. सर्व नीट सुरु असताना २००८ हे वर्ष सुरु झाले, जे मनीषच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि त्रासदायक वर्ष ठरले. कारण या वर्षात त्याच्याकडे एकही काम नव्हते, तो संपूर्ण वर्ष घरी बसून होता. या दरम्यान त्याची पत्नी संयुक्ताने त्याची खूप साथ दिली. तिने संपूर्ण घराची जबाबदारी उचलली. संयुक्ता ऑफिसला गेली, की मनीष घरात जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे आदी सर्व कामवाल्या बाईचे काम करायचा. त्याच्या बायकोने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला खूप मदत केली. २००८ वर्ष संपले तसे त्याचे वाईट दिवशी संपले आणि त्याला काम मिळण्यास सुरुवात झाली. संयुक्ता आणि मनीष हे शालेय मित्र होते. पुढे २००७ ला त्यांनी लग्न केले आज या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मनीषने आतापर्यंत अनेक कार्यक्रम, टीव्ही सिनेमे पुरस्कार वितरण सोहळे यासोबतच डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर, कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा, इंडियन आयडल आदी अनेक गाजलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. याशिवाय तो ‘दबंग’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमानच्या वर्ल्ड टूरमध्येही सहभागी होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान

-करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड

-जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला

हे देखील वाचा